राहुल नार्वेकर अॅक्शन मोडमध्ये : शिवसेनेच्या आमदारांना पाठविल्या नोटीसा !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । ८ जुलै २०२३ ।  राज्यातील शिंदे, फडणवीस यांच्या सत्तेत राष्ट्रवादीचे अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर लागलीच राहुल नार्वेकर अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. निवडणूक आयोगाने शिवसेनेच्या घटनेची प्रत विधानसभा अध्यक्षांना पाठवल्यानंतर राहुल नार्वेकर अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. शिवसेना आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या आमदारांच्या अपात्रतेविषयी राहुल नार्वेकरांकडून नोटीस जारी करण्यात आली आहे. दोन्ही पक्षांच्या आमदारांना त्यांचं म्हणणं मांडण्यासाठी सात दिवसांची मुदत देण्यात आली आहे. राहुल नार्वेकर यांनी शिवसेनेच्या ४० आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या १४ आमदारांना ही नोटीस जारी केली आहे. ANI ने या विषयीचं वृत्त दिलं आहे.

सर्वोच्च न्यायालयात महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचं प्रकरण गेलं तेव्हा सर्वोच्च न्यायालयाने आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय घेण्याची जबाबदारी विधानसभा अध्यक्षांवर सोपवली आहे. आपण शिवसेनेच्या घटनेचा अभ्यास करुन यावर निर्णय घेऊ असं राहुल नार्वेकर यांनी म्हटलं होतं. त्यानुसार त्यांनी निवडणूक आयोगाकडे शिवसेनेच्या घटनेची मागणी केली होती. निवडणूक आयोगाने ही प्रत त्यांना पाठवली आहे. राहुल नार्वेकर हे आता अॅक्शन मोडमध्ये आल्याचं दिसतं आहे. त्यांनी शिवसेनेला आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला नोटीस बजावली आहे. शिवसेनच्या घटनेच्या आधारे हा निर्णय घेण्यात येणार आहे. शिवसेना आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाकडून एकमेकांच्या आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय गघेण्यात आला आहे. यावेळी आमदारांना पुराव्यांसह प्रतिज्ञापत्र सादर करावं लागणार आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम