विद्यार्थिनीचा मोबाईल लंपास; अज्ञात तिघांविरोधात गुन्हा दाखल

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २१ सप्टेंबर २०२२ । शहरात रस्त्याने मैत्रिणीसोबत पायी जात असलेल्या विद्यार्थिनीच्या हाताला झटका देऊन तीन अनोळखी भामट्यांनी मोबाईल लंपास केल्याची घटना घडली. या घटनेत विद्यार्थिनीला दुखापत झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नवी मुंबई येथील दर्शना कांबडे (वय २१) ही विद्यार्थिनी शिक्षणानिमित्त जळगाव येथील कुसुमाई मुलींचे वसतिगृह येथे राहत आहे. सोमवारी (दि.१९) रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास दर्शना ही तिची मैत्रीण तेजस्विनी बेलकर हिच्यासोबत एकलव्य क्रीडा संकुलाच्या रस्त्याने वसतिगृहाकडे जात होती.

अचानक मागून विनाक्रमांकाच्या दुचाकीवर आलेल्या तीन भामट्यांनी दर्शनाच्या हाताला झटका देत तिचा नऊ हजार रुपयांचा मोबाईल हिसकावून पळ काढला.

दरम्यान, याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पो.उप.नि. शांताराम पाटील करीत आहेत.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम