अवैध दारू अड्डयावर पोलिसांचा छापा

advt office
बातमी शेअर करा...

दै. बातमीदार | ६ एप्रिल २०२४ |पारोळा तालुक्यातील म्हसवे शिवारात पारोळा पोलीसांनी गुप्त माहितीच्या आधारे छापे असून यात वीस लिटर गावठी हातभट्टीची दारू आढळली आहे दारू ती जप्त करण्यात आली असून आरोपी फरार झाला आहे.

 

तालुक्यातील म्हसवे येथील विठ्ठल सुपडू भील हा यांच्या राहत्या घराच्या आडोशाला विनापरवाना गैर कायदा गावठी हातभट्टीची दारू विक्री करीत असताना पोलीस निरीक्षक सुनील पवार सहाय्यक फौजदार इक्बाल शेख, हेड कॉन्स्टेबल नाना पवार, कॉन्स्टेबल नरेंद्र पाटील यांनी छापा टाकला. पंधराशे रुपये किमतीची ३० लिटर दारू हस्तगत करण्यात आली. आरोपीला माहित मिळताच आरोपीने मात्र तिथुन पळ काढला.

 

सदर विषयी पारोळा पोलीस ठाण्यात पोलीस नरेंद्र गोकुळ पाटील यांनी फिर्याद दिल्यावरून संशयित आरोपी विठ्ठल सुपडू भिल यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून ‌पुढील तपास पारोळा पोलिस करीत आहेत.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम