वाकोद येथे पोलीस भरती प्रशिक्षण व निशुल्क सराव चाचणी सुरू गौराई स्पर्धा परीक्षा केंद्रातर्फे आयोजन

बातमी शेअर करा...

महाराष्ट्र शासनाने यावर्षी १७,४४१ जागांसाठी महापोलीस भरती जाहीर केली आहे. याशिवाय, आगामी काळात सरळ सेवा, महाराष्ट्र लोकसेवा आयोग गट ब, गट क आणि इतर परीक्षा देखील होणार आहेत.

यासाठी, भवरलाल अँड कांताबाई जैन फाउंडेशनने वाकोद येथे गौराई स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सुरू केले आहे. पंचक्रोशीतील स्पर्धा परीक्षा देणाऱ्या युवक-युवतींसाठी मोफत मार्गदर्शन केंद्र, अभ्यासिका व ग्रंथालय सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. या अंतर्गत, शनिवार व रविवार विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष मार्गदर्शन वर्ग घेतले जातात, ज्यात राज्यातील नामवंत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक मार्गदर्शन करतात.

या केंद्रातर्फे २७ मे ते ५ जून दरम्यान विनामूल्य पोलीस भरती सराव परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. या सराव परीक्षा सकाळी ९ ते ११ या वेळेत गौराई कृषी तंत्रनिकेतन महाविद्यालयाच्या सभागृहात होणार आहे. सराव परीक्षेत गुणवत्ता यादीत येणाऱ्या विद्यार्थ्यांना बक्षिसे दिली जातील. या परीक्षा २७ मे आणि १ ते ४ जून दरम्यान संपन्न होणार आहेत. अधिकाधिक युवक-युवतींनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी ७०५७४४६९१६ या क्रमांकावर व्हाट्सअपद्वारे संपर्क साधावा.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम