प्रसाद ओकने बायकोचा लूकच बदलविला.. फोटो व्हायरल

advt office
बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १३ ऑक्टोबर २०२२ ।  मराठी मनोरंजन सृष्टीतील रोज कुणी तरी सोशल मिडीयावर नवनवीन व्हिडीओ टाकून व्हायरल होत आहे. त्याचाच एक अनुभव घेत अभिनेता म्हणजे प्रसाद ओक. प्रसाद सोशल मीडियावरही बराच सक्रिय असतो. प्रसादसोबत त्याची बायको मंजिरी ओकही सोशल मीडियावर बरीच सक्रिय असलेली पहायला मिळते. मराठीतील लोकप्रिय कपलमध्ये त्यांची गणना होते. नेहमीच ते कपल गोल्स देताना दिसतात. अशातच दोघांचा नवा व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओनं सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे.

‘आरारारारारा…. काय तो खतरनाक लूक, खूप सुंदर मॅम, हास्य इमोजी’, अशा अनेक कमेंट या व्हिडओवर येत आहेत. दोघांचा हा कॉमेडी अंदाज चाहत्यांचा पसंतीस उतरस आहे. प्रसाद आणि मंजिरी कायमच हटके आणि भन्नाट व्हिडीओनं प्रेक्षकांचं लक्ष वेधत असतात. यावेळीही त्यांनी नव्या व्हिडीओनं सोशल मीडियावर सगळ्यांतं लक्ष वेधलं आहे. दरम्यान, प्रसाद आणि मंजिरी दोघांमध्ये खास बॉन्डिंग आहे. वारंवार हे दिसूनही येतं. दोघेही निरनिराळे फोटोशूट करत कपल्स गोल देताना दिसतात. मराठी सिनेसृष्टीतील या जोडीचं चाहते नेहमीच कौतुक करतात.

 

 

समोर आलेल्या व्हिडीओमध्ये मंजिरी कपडे बदलणारं रिल करत आहे. यामध्ये तिनं शॉर्ट वनपीस घेतल्याचं दिसतंय मात्र प्रसाद तिचे कपडे बदलतो आणि त्याऐवजी तिथे साडी ठेवतो. नंतर मंजिरीचा लुक बदलून ती साडीमध्ये पहायला मिळते. साडी पाहून ती स्वतः थक्क होते. मग तिला कळतं की हे प्रसादनं केलंय. दोघांचा हा भन्नाट रील सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. अनेक प्रतिक्रिया या व्हिडीओवर येत आहेत.

 

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम