हिवाळ्यात घ्या नवजात बाळांची काळजी !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । ९ नोव्हेबर २०२२ हिवाळ्यात भरपूर महिला प्रसूती होण्याचे प्रमाण आहे, यावेळी नवजात बाळांसाठी सर्वात कठीण काळ मानला जातो. बाळाला किती थंडी वाजते हे सांगू शकत नाही. त्यामुळे या काळात नवजात बालकांची व्यवस्थित काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. हिवाळ्यात बाळाच्या आरोग्यावर परिणाम होऊ नये म्हणून कोणत्या गोष्टी लक्षात ठेवणे अत्यंत आवश्यक आहे याबाबत आज आम्ही मार्गदर्शन करणार आहोत.

बाळाला थंडी वाजू नये म्हणून अनेक जण या काळत त्याचे अंग ब्लँकेटने पूर्णपणे झाकून ठेवतात. मात्र, अनेकदा हे ब्लँकेट बाळाच्या डोळ्यांवर किंवा तोंडावर येऊ शकते. या काळात रूमचे तापमान सामान्य ठेवण्याचा प्रयत्न करा. बाळाला पूर्ण ब्लँकेटने गुंडाळल्याने श्वास घेण्यासही त्रास होऊ शकतो.
या काळात बाळाचे शरीर गरम रहावे म्हणून अनेक जण रूम हिटर लावतात. बाळाला हिटरजवळ ठेवल्याने त्याचा थेट परिणाम बाळाच्या नाजूक त्वचेवर होण्याची भीती असते. हीटर लावताना यामुळे रूमचे तापमान कशाप्रकारे सामान्य राहिल याकडे लक्ष असू देत.

अनेकजण अनावधानाने बाळाच्या शेजारी जाड उशा किंवा जाड कपडे ठेवतात. मात्र, असे केल्याने चुकून बाळाचे हात किंवा पाय या खाली दाबले जाऊ शकण्याची भीती असते. त्यामुळे बाळाच्या शेजारी जाड कपडे ठेवणे टाळा. वातावरण बदलाची नवजात बालकांना सवय नसल्याने या काळात हवामान बदलाचा त्रास त्यांना होऊ शकतो. अनेकांना या काळात ताप येऊ शकतो. अनेकांना हा हंगामी ताप वाटू शकतो. मात्र, याकडे दुर्लक्ष करणे महागात पडू शकते. त्यामुळे बाळाच्या हलक्या तापाकडे दुर्लक्ष करण्याऐवजी उपचार करण्याकडे भर द्या.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम