पंतप्रधान मोदी नागपुरात दाखल !
दै. बातमीदार । ११ डिसेंबर २०२२ । पंतप्रधान नरेंद्र मोदी नागपूर विमानतळावरावरून सर्वप्रथम नागपूर रेल्वेस्थानकावर पोहोचले. येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वंदे मातरम एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवला. नागपूर ते बिलासपूर ही वंदे भारत एक्सप्रेस धावणार आहे. या एक्सप्रेसमध्ये प्रवाशांना सर्व अत्याधुनिक सुविधा देण्यात आल्या आहेत. देशात अशा रेल्वेंची संख्या आणखी वाढवण्याची केंद्र सरकारची योजना आहे.
समृद्धी महामार्गाच्या नागपूर ते शिर्डी या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी नागपुरात दाखल झाले आहेत. नागपूर विमानतळावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे स्वागत केले. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फ्रिडम पार्क मेट्रो स्थानकापासून खापरी मेट्रो स्थानकापर्यंत मेट्रोमधून शालेय विद्यार्थ्यांसोबत प्रवास केला. येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘नागपूर मेट्रो टप्पा 1’चे लोकार्पण केले. तसेच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘नागपूर मेट्रो टप्पा-२’ ची पायाभरणीही केली. त्यानंतर नरेंद्र मोदी नागपूर आणि शिर्डीला जोडणाऱ्या समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण करणार आहेत आणि महामार्गाचा दौरा करणार आहेत.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम