डबल इंजिन सरकारमुळे राज्याचा विकास जोरात ; पंतप्रधान मोदी !
दै. बातमीदार । ११ डिसेंबर २०२२ । पंतप्रधान नरेंद्र मोदी नागपूर दौऱ्यावर आज सकाळी आले असता. ‘आज संकष्टी चतुर्थी आहे. कोणतेही शुभकाम करताना आपण प्रथम गणेश पुजन करतो. आज नागपुरात आहोत. तर, टेकडीच्या गणपती बाप्पाला माझे वंदन’, अशा शब्दांत आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठीतून आपल्या भाषणाची सुरूवात करत जनतेशी संवाद साधला. समृद्धी महामार्ग, नागपूर मेट्रो तसेच नागपूर एम्स रुग्णालयाचे लोकार्पण केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी जाहीर सभेत बोलत आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेही कौतुक केले. डबल इंजिन सरकारमुळे महाराष्ट्राचा विकास वेगाने होत आहे, असे नरेंद्र मोदी म्हणाले.
नरेंद्र मोदी म्हणाले, आज 11 डिसेंबर हा दिवस महाराष्ट्रासाठी अतिशय महत्त्वाचा आहे. आज संकष्ट चतुर्थीच्या दिवशीच महाराष्ट्राच्या नक्षत्रात 11 तारे जोडले गेले आहेत. समृद्धी महामार्ग हा पहिला तारा आहे. नागपूर एम्स रुग्णालय हा दुसरा तारा आहे. नागपूर मेट्रोच्या पहिल्या टप्प्याचे लोकापर्ण तसेच, दुसऱ्या टप्प्याचे भूमिपूजन हा तिसरा तारा आहे. त्यांतर अशाच प्रकारे राष्ट्रीय वन हेल्थ संस्था (एनआयओ ), नाग नदी प्रदूषण निर्मूलन प्रकल्प, चंद्रपूर येथील केंद्रीय पेट्रोकेमिकल्स अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान (सीआयपीईटी) संस्था, चंद्रपूरमधील ‘हिमोग्लोबिनोपॅथी संशोधन, व्यवस्थापन आणि नियंत्रण केंद्र हे ते 11 तारे आहेत. या ताऱ्यांमुळे महाराष्ट्राचा विकास लखलखणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, विकासाचे हे 11 तारे महाराष्ट्राच्या विकासाला नवी उर्जा, गती देतील. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त राज्यात 75 हजार कोटींच्या विकासकामांचे लोकार्पण व शुभारंभ केल्याबद्दल राज्य सरकारचे अभिनंदन. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, आज महाराष्ट्रात झालेल्या विविध विकासकामांचे लोकार्पण हे या गोष्टीचे प्रमाण आहे की, राज्यात डबल इंजिन सरकार वेगाने काम करत आहे. समृद्धी महामार्गामुळे केवळ नागपूर-मुंबई नव्हे तर राज्यातील 24 जिल्हे आधुनिक कनेक्टिव्हीटीने जोडली जाणार आहेत. शेतकरी, उद्योजक, विविध धार्मिक स्थळांना जाणारे भाविक यांना यामुळे मोठा फायदा होणार आहे. समृद्धी महामार्गामुळे रोजगाराच्या नवी संधी उपलब्ध होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी विरोधकांवरही निशाणा साधला. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, काही पक्ष राजकारणात तसेच देशाच्या विकासातही शॉर्टकर्टचा वापर करतात. देशाच्या विकासासाठी हे अतिशय घातक आहे. या वाक्यातून नरेंद्र मोदी यांनी अप्रत्यक्षपणे आपवर निशाणा साधल्याचे बोलले जात आहे. तर, काही पक्षांची विकासाची कामे म्हणजे आमदनी अठ्ठनी, खर्चा रुपया अशी आहेत. यामुळे देशाचे नुकसान होत आहे, असेही मोदी म्हणाले.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम