आजचे राशिभविष्य दि ११ डिसेंबर २०२२

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । ११ डिसेंबर २०२२ ।  मेष- अफवांवर विश्वास ठेवू नका. नोकरीला प्राधान्यस्थानी ठेवा. तुमच्या बुद्धिमत्तेची परीक्षा आहे. योग्य ठिकाणी गुंतवणूक करा.
वृषभ- नात्यांवर विश्वास ठेवा. आज बिघडलेली नातीही मार्गी लागणार आहेत. कोणा एका व्यक्तीची खास मदत होणार आहे.
मिथुन- काही खास गोष्टींवर लक्ष केंद्रीत करण्याची तुमची क्षमता वाढेल. भावनात्मक निर्णय घेणे धोक्याचे ठरेल. वेळेला महत्त्व द्या.
कर्क– सामाजिक कामांमध्ये आज तुमचा सहभाग वाढेल. सावध राहा. सर्व क्षेत्रांमध्ये आज तुमचा बोलबाला असेल. काही क्षणी मात्र सावध राहा.
सिंह- कुटुंबात सुखशांती नांदेल. इतरांशी विनम्रतेनं वागा. आरोग्याची काळजी घ्या.
कन्या- आज तुमच्याप्रती इतरांच्या मनात असणारी आदराची भावना वाढेल. व्यवसायात लक्ष द्या नफा होणार आहे. सर्वांना सोबत घेऊन पुढे जा.
तुळ- शुभकार्यांसाठी खर्च कराल. परिस्थिती तुमच्या नियंत्रणार असेल. पैशांच्या व्यवहारात मात्र सावधगिरी बाळगा. तुमची मूल्य सोडू नका.
वृश्चिक- अडकलेली आर्थिक कामं मार्गी लागतील. विचारपूर्वक कामं करा. करिअरमध्ये मोठे निर्णय घ्याल. फक्त अतिविचार टाळा.
धनू- सुखसंपत्तीनं घरात आनंदाची बरसात होणार आहे. सर्वजण तुमचं समर्थन करणार आहेत. आर्थिक विषयांवर भर द्या.
मकर – दीर्घकालीन कामं पूर्ण करा. आज अडकलेली कामं मार्गी लागतील. अनेक विषय तुम्ही चपळाईनं हाताळाल. कार्यक्षमता वाढेल.
कुंभ – कुटुंबाकडून सहकार्य मिळणार आहे. कुटुंबियांच्या आनंदानं आज तुम्हाला सुखानुभव मिळणार आहे. आपल्या माणसांच्या शिकवणुकीतून पुढे जा.
मीन– देवाणघेवाणीच्या व्यवहारांमध्ये सकारात्मक बदल होणार आहेत. विचारांनी आज तुम्ही प्रगल्भ व्हाल असे प्रसंग निर्माण होणार आहे. धनलाभाचा योग आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम