रेल्वेने दिली वारकऱ्यांना खुशखबर : विठ्ठलाचं वेळेवर होणार दर्शन

बातमी शेअर करा...

बातमीदार | १४ नोव्हेबर २०२३

राज्यातील लाखो वारकरीना खुशखबर आता मिळाली आहे. यंदाच्या कार्तिकी यात्रेसाठी राज्यभरातून भाविक पंढरपूर येथे दाखल होत असतात. विठ्ठलाचं वेळेवर दर्शन व्हावं, म्हणून भाविक मिळेल त्या वाहनाने प्रवास करतात. अशातच प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून रेल्वेने मोठा निर्णय घेतला आहे. मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागाकडून विशेष रेल्वे गाड्यांचे नियोजन केले आहे.

रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, मिरज-कुर्डुवाडी, मिरज-पंढरपूर आणि पंढरपूर-मिरजदरम्यान २० ते २७ नोव्हेंबरपर्यंत ४ फेऱ्यांमध्ये या विशेष गाड्या धावणार आहे. गाडी क्रमांक ०१४४३ पंढरपूर येथून सकाळी ९ वाजून २० मिनिटांनी सुटणार आहे. ही गाडी मिरजेत दुपारी १२ वाजून ५ मिनिटांनी पोहचणार आहे. त्याच दिवशी मिरज-पंढरपूर-मिरज गाडी क्रमांक ०१४४४ मिरजेतून दुपारी १ वाजून १० वाजता सुटेल.

ही गाडी पंढरपूर येथे सायंकाळी ५ वाजून ५ मिनिटांनी पोहोचेल. याशिवाय मिरज-पंढरपूर-मिरज ही विशेष रेल्वेगाडी २१ ते २५ नोव्हेंबर रोजी ४ फेऱ्यांत धावणार आहे. मिरज-पंढरपूर गाडी क्रमांक (०१४४५) मिरजेतून सकाळी ८ वाजता सुटेल व पंढरपूर येथे त्याच दिवशी सकाळी १० वाजून २५ मिनिटांनी पोहोचेल. पंढरपूर-मिरज गाडी क्रमांक ०१४४६ पंढरपूर येथून सकाळी ११ वाजता सुटेल. मिरज येथे त्याच दिवशी दुपारी २ वाजता पोहोचेल. मिरज-कुर्डुवाडी-मिरज गाडी २१ ते २४ नोव्हेंबरपर्यंत चार फेऱ्यांत धावणार आहे. वारकऱ्यांनी वेळापत्रक पाहून तिकीटांची बुकिंग करावी, असं रेल्वेकडून सांगण्यात आलं आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम