बांधकामाच्या ठिकाणी ९ वर्षीय बालकाच्या छातीत घुसली आसारी !

बातमी शेअर करा...

बातमीदार | १४ नोव्हेबर २०२३

दिवाळीच्या सणाची अद्याप मोठी धामधूम सुरु असतांना एक धक्कादायक घटना एरंडोल शहरात घडली आहे. येथील ९ वर्षीय बालकाचा छातीत आसारी घुसून मृत्यू झाल्याची घटना सोमवारी दि.१३ रोजी संध्याकाळी उघडकीस आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, एरंडोल शहरातील हिमालय पेट्रोल पंपामागील रहिवासी विशाल रविंद्र गायकवाड (वय ९) असे मयत बालकाचे नाव असून तो आई, वडील, लहान भाऊ- बहीण यांच्यासह राहतो. हातमजुरी करून त्याचा परिवार उदरनिर्वाह करतात. एरंडोल नगरपालिकेचे हिमालय पेट्रोलपंपामागे गटारीचे ढापे टाकायचे काम सुरु आहे. तेथे काही आसाऱ्या उघड्यावर धोकादायक स्थितीत ठेवलेल्या होत्या. सोमवारी विशाल त्याच्या मित्रांसह तेथे खेळत असताना अचानक तो पडला आणि एक आसारी त्याच्या छातीत घुसली. यामुळे आजूबाजूच्या नागरिकांनी धाव घेत त्याला खाजगी रुग्णालयात उपचाराला नेले. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मयत घोषित केले.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम