राज्यातील खान्देशसह काही जिल्ह्यात दोन दिवस पावसाचा अंदाज !
बातमीदार | २१ सप्टेंबर २०२३| गालच्या उपसागरात हवेच्या कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याने पावसाला पोषक हवामान तयार झाले आहे. त्यामुळे आगामी 2 दिवस राज्यात विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज नागपूर हवामान वेधशाळेने वर्तवला आहे. विदर्भात त्याचा जोर अधिक राहण्याची शक्यताही व्यक्त करण्यात आली आहे.
विदर्भासह राज्यात उन्हाचा चटका चांगला वाढला असल्याचे जाणवत आहे. सर्वदूर ढगाळ हवामानामुळे उकाड्यात मोठी वाढ झाली आहे. तुरळक ठिकाणी एखाद दुसरी सर सर्वांच्याच मनाला सुखावून जात आहे. पावसाला पोषक हवामान झाल्याने आज विदर्भातील अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली जिल्ह्यांत जोरदार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे.
मध्य महाराष्ट्रातील नाशिक, नगर, जळगाव आदी जिल्ह्यामध्ये आज पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर दुसरीकडे दुष्काग्रस्त भाग असलेल्या मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड जिल्ह्यातही जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागने वर्वतला आहे. तसेच विदर्भातील बुलडाणा, अकोला, वाशीम, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर जिल्ह्यांत विजांसह पावसाची शक्यता आहे. कोकणात तुरळक ठिकाणी जोरदार, तर उर्वरित राज्यात हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम