राज ठाकरेंनी दिला पत्रकारांना सल्ला !
बातमीदार | १९ ऑगस्ट २०२३| गेल्या दोन दिवसांच्या पुणे दौऱ्यावर आलेले मनसे अध्यक्ष राज ठाकरे या दौऱ्या दरम्यान आज १९ ऑगस्ट ठाकरे यांच्या हस्ते पिंपरी चिंचवड येथे राज्यातील ज्येष्ठ पत्रकारांचा गौरव समारंभ आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात राज ठाकरे यांनी राज्यातील पत्रकारांच्या सद्य स्थितीवर भाष्य केलं. पत्रकारांवर हल्ले होत आहेत हे अत्यंत चुकीचे आणि निषेधार्ह आहे, असे राज ठाकरे म्हणाले.
ठाकरे म्हणाले की, तुम्ही लिहीता, व्यक्त होता त्यांनंतर तुम्हाला ट्रोल केलं जातं. पण ते तुम्ही वाचता कशाला? माझं भाषण, मुलाखत एकदा झाली की झाली. शब्द गेले की कोणाला काही वाटेल ते वाटेल. तुम्ही कोणाला आवडलं ते पाहत बसू नका. मोबईल नावाचं खेळणं हातात आल्याने अनेक निरुद्योगी व्यक्त व्हायला लागले आहेत. त्यांना घरात बसून करायचं काय असा प्रश्न पडतो. मग असं ट्रोल केलं जातं. त्यांना इतिहास, बातमीचा विषय, पत्रकारिती काही माहिती नसतं. ते फक्त व्यक्त होतात. राजकीय पक्षांनी पाळलेले लोकही आहेतच. त्या पाळलेल्या लोकांवर कशाला प्रतिक्रिया देता, असा प्रश्नही राज ठाकरेंनी पत्रकारांना विचारला. त्यांना दर महिन्याला ते लिहायचे पैसे मिळतात, त्यांचा कशाला विचार करता. जे महाराष्ट्र हिताचं असेल ते निर्भिडपण लिहीनं बोलण महत्वाचे आहे, असे राज ठाकरे यावेळी म्हणाले.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम