राजेश वेद, गिरीश कुळकर्णी यांनी स्वीकारली रोटरीच्या पदाची सूत्रे

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार | 01 | 07| 2022 | जळगाव येथील रोटरी क्लब जळगावचे नूतन अध्यक्ष राजेश वेद यांनी व मानद सचिव गिरीश कुळकर्णी यांनी कुलगुरु डॉ. व्ही.एल.माहेश्वरी यांच्या प्रमुख उपस्थितीत पदाची सूत्रे स्विकारली. गणपती नगरात रोटरी हॉलमध्ये शुक्रवार दि.1 जुलै रोजी सायंकाळी पदग्रहण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

अध्यक्ष राजेश वेद यांनी आगामी वर्षात होणाऱ्या कार्याबद्दल माहिती देत कार्यकारिणीची घोषणा केली. त्यात आयपीपी संदीप शर्मा, उपाध्यक्ष मनोज जोशी, सहसचिव सुभाष अमळनेरकर, कोषाध्यक्ष प्रदीप खिवंसरा, तर कार्यकारीणी सदस्य म्हणून छबीलदास शाह, प्रेम कोगटा, डॉ. प्रदीप जोशी, डॉ. जयंत जहागिरदार, डॉ. तुषार िफरके, कॅप्टन मोहन कुळकर्णी, योगेश गांधी, उदय पोतदार, राघवेंद्र काबरा, विजय जोशी, जितेंद्र ढाके, आसिफ मेमन, डॉ. काजल िफरके, किशोर तलरेजा, मुकेश महाजन, चंदन महाजन, अमोल पाटील आदिंचा समावेश आहे.

मावळते अध्यक्ष संदीप शर्मा यांनी कार्य अहवाल सादर केला. प्रांतपालाच्या संदेशाचे वाचन सहप्रांतपाल अरुण नंदर्षी यांनी केला. अतिथींचा परिचय प्रेम कोगटा यांनी करुन दिला. कुलगुरु डॉ. माहेश्वरी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. डॉ. स्मिता पाटील व विशाखा पोतदार यांनी गणेश वंदना सादर केली. आभार प्रेसिडेंट इलेक्ट मनोज जोशी यांनी मानले. राष्ट्रगीताने सोहळ्याची सांगता झाली.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम