राजसाहेब तुम्हीच महाराष्ट्राला वाचवा ; अभिनेत्रीने केले ट्विट
बातमीदार | ९ ऑक्टोबर २०२३
राज्यभरातील अनेक टोलनाक्याच्या मुद्द्यावर नेहमीच मनसे आक्रमक भूमिका घेत असते. गेल्या ४ दिवसापासून मनसेचे ठोणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी उपोषण केले होते. रविवारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांची भेट घेऊन उपोषण मागे घेण्यास सांगितले. त्यानंतर राज ठाकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यांनतर आता टोलसंदर्भात अभिनेत्री तेजस्वीनी पंडितने पोस्ट शेअर केली आहे. अभिनेत्री तेजस्वी पंडितने एक्स या प्लॅटफॉर्मवर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये अभिनेत्रीने सध्याच्या टोल वाढीच्या मुद्द्यावर भाष्य करणारे ट्विट केले आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. यात देवेंद्र फडणवीस पत्रकरांशी संवाद साधत आहे. यावेळी त्यांना टोल मुद्द्यावर प्रश्न विचारण्यात आला. “असं आहे की जी गोष्ट आम्ही त्या (शिवसेना-भाजप युती) वेळेस केली होती. राज्यातील सर्व टोलवर जे फोर व्हिलर किंवा छोट्या गाड्या आहेत त्यांना आम्ही मुक्ती दिली होती. फक्त कमर्शियल-मोठ्या वाहनांचे टोल आपण महाराष्ट्राच्या टोलवर घेत आहोत”. असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
या व्हिडिओवर तेजस्वीनी पंडितने एक्स वर पोस्ट शेअर केली आहे. ‘म्हणजेऽऽऽऽऽऽऽ ??????? ह्यांना कळतंय ना नेमकं हे काय बोलतायत ?? मग इतके वर्ष आम्ही जो टोल भरतो आहोत तो कुणाच्या खिशात जातोय ? राजसाहेब तुम्हीच आता काय ते करा,महाराष्ट्राला वाचवा ह्या टोल धाडीतून !! “माननीय उपमुख्यमंत्री” असे विधान कसे असू शकता? अविश्वसनीय. तुमचीही फसवणूक झाली असेल तर शेअर करा.’ असं कॅप्शन दिले आहे. याआधीही अनेक मराठी कलाकारांनी वाढत्या टोलवर आपले मत मांडले होते. मध्यंतरी अभिनेत्री ऋतुजा देशमुखनेही मुंबई पुणे महामार्गावरील टोल प्रकरणी व्हिडिओ शेअर केला होता. तिने त्यावेळी पुण्याला जाताना लोणावळ्याला थांबल्यावर पुन्हा एकदा टोल आकारला गेल्याची तक्रार केली होती. त्यानंतर अनेक कलाकारांनी या टोल प्रकरणावर आपले मत मांडले होते.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम