रामदेववाडी अपघात: तिघा संशयितांचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला; कारागृहातील मुक्काम वाढला
जळगाव – रामदेववाडी अपघात प्रकरणात अटकेत असलेल्या तिघा संशयितांचा जामीन अर्ज न्यायालयाने सोमवारी फेटाळला. अर्णव कौल, अखिलेश पवार, आणि ध्रुव सोनवणे या तिघांच्या अर्जाची सुनावणी न्यायाधीश जयदीप मोहिते यांच्या न्यायालयात झाली. सरकारी वकील पंढरीनाथ चौधरी, अँड. अविनाश जाधव आणि अँड. हरुण देवरे यांनी युक्तिवाद केला.
७ मे रोजी जळगाव-पाचोरा रस्त्यावर रामदेववाडी येथे एका भरधाव कारने दुचाकी चालवणाऱ्या वच्छलाबाई चव्हाण आणि त्यांच्या मुलांसह भाच्याला चिरडले होते. या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला, तर एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
न्यायालयाने संशयितांचा जामीन अर्ज फेटाळला, कारण अपघाताच्या कारमध्ये सापडलेल्या गांजाच्या पुड्यांचा तपास अद्याप बाकी आहे. तसेच, संशयितांना जामीन दिल्यास फिर्यादी आणि अन्य साक्षीदारांवर दबाव येऊ शकतो, असा सरकारी वकिलांचा युक्तिवाद होता. त्यामुळे संशयितांचा कारागृहातील मुक्काम वाढला आहे.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम