अपार्टमेंटमध्ये भीषण आग : ९ जणांचा दुर्देवी मृत्यू !

बातमी शेअर करा...

बातमीदार | १३ नोव्हेबर २०२३

देशभरात दिवाळीचा सण धूमधडाक्यात सुरु असतांना एक धक्कादायक घटना हैदराबादमध्ये घडली आहे. येथील नामपल्ली परिसरातील बाजारघाट येथील एका अपार्टमेंटमध्ये सोमवारी आग लागली. अपार्टमेंटच्या खाली असलेल्या गॅरेजमध्ये ही आग लागली. त्यानंतर हळूहळू आग पाच मजली इमारतीत पसरली. आग इतकी भीषण होती कि ९ जणांचा मृत्यू झाला आहे.

आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या पथकाने घटनास्थळ गाठून शिडीच्या साहाय्याने बालक व आईला बाहेर काढले. आगीच्या ज्वाळा इतक्या तीव्र होत्या की अपार्टमेंटमध्ये वरच्या मजल्यावर राहणारे काही लोक बाहेर पडू शकले नाही. हैदराबाद सेंट्रल झोनचे डीसीपी व्यंकटेश्वर राव यांनी सांगितले की, तळमजल्यावरील गॅरेजमध्ये कारच्या दुरुस्तीचे काम सुरू होते. त्यानंतर गोदामातील रसायनांनी भरलेल्या ड्रमवर ठिणगी पडून आग लागली. या अपघातात तीन जण जखमीही झाले आहेत.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम