ठाकरे गटाला धक्का : माजी आमदार भाजपात

advt office
बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १४ ऑक्टोबर २०२२ । राज्यात शिवसेनेला गेल्या चार महिन्यापासून राजकीय हादरे बसू लागले आहे, आताच शिवसेनेचे चिन्ह गोठविल्यानंतर पुन्हा ठाकरे गटाचे माजी आमदार अवधूत तटकरे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीमध्ये अवधूत तटकरे भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

एकीकडे उद्धव ठाकरे आणि इतर पदाधिकाऱ्यांकडून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला लागलेली गळती रोखण्याचा प्रयत्न सुरू असतानाच दुसरीकडे मात्र, नेत्यांचे शिंदे गट आणि भाजपात प्रवेश सुरू असल्याचं दिसून येत आहे. अवधूत तटकरे हे ठाकरे गटाचे रोहा- श्रीवर्धन मतदारसंघाचे माजी आमदार आहेत. त्याचबरोबर ते राष्ट्रवादीचे खासदार सुनिल तटकरे यांचे पुतणेही आहेत. अवधूत तटकरे आपल्या समर्थकांसोबत आज भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीमध्ये ते भाजपात प्रवेश करणार आहेत.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम