कर्नाटक निवडणुकीत रोहित पवारांनी केला जोरदार प्रचार !
दै. बातमीदार । १ मे २०२३ । देशातील कर्नाटक विधानसभेसाठी सर्वच पक्षांनी प्रचार जोरदार करीत आहे. यातच रविवारी महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार रमाकांत कोंडुसकर यांच्या प्रचारासाठी काढलेल्या रोड शोला राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार यांनी उपस्थित दिली होती. यावेळी अनेकांनी प्रचंड गर्दी केली होती. यावेळी त्यानी सभेला संबोधित केलं यावेळी ते म्हणाले की, फक्त राजकारणासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेणाऱ्यांना दूर करा आणि अन्यायाविरोधात आवाज उठवणाऱ्या कार्यकर्त्याला विधानसभेत पाठवा, असे प्रतिपादन कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी केले.
बेळगाव दक्षिण मतदार संघातील समितीचे उमेदवार कोंडुसकर यांच्या प्रचारासाठी वडगाव येथील मंगाई मंदिर पासून रोड शोला सुरुवात झाली.हजारो कार्यकर्ते रोड शोमध्ये सहभागी होण्यासाठी भगवे ध्वज आणि वेगवेगळ्या प्रकारचे फलक घेऊन दाखल झाले होते.
आमदार पवार यांच्यासह महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते वाहनातून मार्गस्थ झाले. पाटील गल्ली, कारभार गल्ली, नाझर कॅम्प, वडगाव रोड, नाथ पै सर्कल, खडे बाजार भागातून रोड शो केला. यात १० हजारांहून अधिक युवक, महिला व कार्यकर्ते सहभागी झाले होते. रोड शोची सांगत झाल्यानंतर शिवसृष्टी समोर सभेचे आयोजन केले. आमदार पवार यांनी मराठी भाषा आणि संस्कृती जपण्यासाठी अनेक वर्षांपासून लढा सुरू आहे. मी या ठिकाणी मराठीसाठी लढणाऱ्या लोकांसोबत लढण्यासाठी आलो आहे. मराठी भाषिक कधीही इतर भाषा किंवा समाजाच्या विरोधात नसतात. बंगळूर येथे ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा अवमान झाला. त्यावेळी आंदोलन करणाऱ्या कोंडुसकर यांच्यासह कार्यकर्त्यांना जेलमध्ये टाकले. त्यामुळेच आपल्या विचाराचा आमदार निवडून येणे काळाची गरज आहे. लोकांमधे जाऊन काम करणाऱ्या प्रामाणिक कार्यकर्त्याला विजयी करा. विधानसभेची लढाई सोपी नाही मात्र भ्रष्टाचार आणि हुकुमशाही गाढण्यासाठी सर्वांना संघटित व्हावे लागेल. माजी महापौर मालोजी अष्टेकर, समितीचे खजिनदार प्रकाश मरगाळे आदिनी मनोगत व्यक्त केले. रणजित चव्हाण-पाटील, नेताजी जाधव, नगरसेवक रवी साळुंखे आदी उपस्थित होते.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम