या सवयीमुळे तुम्हाला होवू शकतो कर्करोग !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १ मे २०२३ ।  प्रत्येक जोडीदारासोबत केले मुख मैथुन अर्थातच ओरल सेक्स सर्वांना सुरक्षित वाटत असते.कारण ओरल सेक्समध्ये गर्भधारणेची चिंता नसते आणि यामुळे कोणताही आजार होण्याचा धोकाही कमी होतो. पण आरोग्य तज्ज्ञांच्या मते यावर विश्वास ठेवणे चुकीचे आहे. सुरक्षित मार्गाने ओरल सेक्स न केल्यामुळे लैंगिक संक्रमित आजार (एसटीडी) होण्याचा धोका असल्याचे तज्ञांचे म्हणणे आहे.

यूके आणि यूएसमध्ये असुरक्षित ओरल सेक्स हा घशाच्या कर्करोगासाठी एक प्रमुख धोकादायक घटक ठरत आहे, असा दावा एका नवीन अभ्यासात करण्यात आला आहे. ‘गर्भाशयमुखाचा कर्करोग’ हा या दोन देशांमध्ये कर्करोगाचा सर्वात जास्त नोंदलेला प्रकार होता, तर ‘घशाचा कर्करोग’ हा गेल्या दोन दशकांमध्ये झपाट्याने वाढल्यामुळे त्याला ‘महामारी’ असे संबोधले जात आहे, असे तज्ज्ञ सांगतात.

बर्मिंगहॅम विद्यापीठातील डॉ. हिशाम मेहन्ना यांनी ‘द कॉन्व्हर्सेशन जर्नल’मध्ये लिहिले आहे की, “घशाचा कर्करोग होण्यामागील अनेक कारणांपैकी एक ह्युमन पॅपिलोमा व्हायरस (Human Papilloma virus) हादेखील आहे, जो गर्भाशयमुखाच्या कर्करोगाचे मुख्य कारण आहे.” HPV हा एक सामान्य विषाणू आहे. त्याचा आधीच संसर्ग असलेल्या व्यक्तीसोबत योनीमार्गे, गुदद्वारामार्गे, असुरक्षित ओरल सेक्स केल्यामुळे तो पसरू शकतो.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम