बातमी शेअर करा...

अमळनेर (प्रतिनिधी) स्वतंत्र्य भारताच्या अमृत महोत्सवी दिनाच्या संध्येला संपुर्ण भारत आनंदोत्सव साजरा करीत होता याच आनंदाला अमळनेर येथील मक्सूदभाई बोहरी मित्र मंडळ परिवारांतर्फे ख्यातनाम कवी, पत्रकार, व साहित्यीक मा.श्री.सुभाषदादा पाटील, (घोडगांवकर) यांचा 75 वा वाढदिवसा मोठया उत्स्फुर्तपणे मक्सूदभाई बोहरी यांच्या घरी साजरा करण्यात आला. भारतीय स्वांतत्र्याच्या दिनी जन्माला आलेल्या अशा या भाग्यवान व अष्टपैलू व्यक्तिमत्वाने त्यांचा वाढदिवस हा मकसूदभाई बोहरी मित्रमंडळासोबत साजरा केला, असे अहोभाग्य हे या मक्सूदभाई बोहरी मित्रमंडळाला मिळाले असे उद्गार मंडळाचे अध्यक्ष मक्सूदभाई बोहरी यांनी कार्यक्रमाप्रसंगी उपस्थितांना संबोधित करतांना सांगितले. एका सच्च्या साहित्यीकाचा, कविचा सन्मान हा अमळनेरातील सुप्रसिध्द असे गोर-गरीबांचे डॉक्टर, जुन्या बाविस्कर दवाखान्याचे तसेच डॉक्टरी पेशा हा वयाच्या 78 व्या वर्षी सुध्दा इमानदारीने सेवाभाव म्हणून सांभाळणारे आदरणिय डॉक्टर श्री.दादासाहेब बी.आर.बाविस्कर यांच्या शुभहस्ते करण्यात आला.
सदर कार्यक्रमाचे आयोजन हे मकसुदभाई बोहरी यांनी मोठया उत्साहाने व आदरातिथ्याने केले होते. असे आदरातिथ्य करणे हे फ ार थोड्याच लोकांना जमते. यात मक्सूदभाई बोहरी यांची बरोबरी कोणीही करू शकणार नाही. सदर कार्यक्रमात सुरवातीला उपस्थिताचा परिचय करण्यात आला तद्नंतर कार्यक्रमाला सुरवात करण्यात आली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन हे योगेश पाने, सर यांनी केले. प्रास्ताविक पत्रकार राजेंद्र सुतार यांनी केले. तसेच आभारप्रदर्शन मक्सूदभाई बोहरी यांनी केले. या कार्यक्रमाप्रसंगी सर्वश्री- दिपकभाई तिवारी, रमेशबापू पाटील, अविनाशराव सोनार, अविनाशराव कोतवाल, ताहा बुकवाला, खदिर सादिक, पत्रकार अजय भामरे व सोपान भवरे, हितेश बडगुजर मोहसिनभाई पठाण, गणेश बडगुजर, इनायतभाई बोहरी आदि मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी सत्कारमुर्ती सुभाषदादा पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले आणि डॉ. बी. आर. बाविस्कर यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानावरून आपले मौलिक विचार यावेळेस मांडले.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम