15 ऑगस्ट 1947 पहिल्या स्वातंत्र्यदिनी जन्मलेल्या दोन महान विभूतींचा अमळनेरात सत्कार….. –स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त अमळनेर पत्रकार संघाचा उपक्रम

बातमी शेअर करा...

अमळनेर-(प्रतिनिधी)15 ऑगस्ट 1947 म्हणजेच अखंड भारताचा पहिला स्वातंत्र्यदिन या दिवशी अमळनेर येथील ज्या दोन महान विभूतींचा जन्म झाला आणि जन्मताच भारतीय स्वातंत्र्याचे ते साक्षीदार ठरलेत त्यांचा स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त 15 ऑगस्ट रोजी अमळनेर शहर व तालुका पत्रकार संघाच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला.
अमळनेर प्रताप महाविद्यालयाचे निवृत्त आदर्श प्राध्यापक एन आर शाह सर आणि जेष्ठ पत्रकार,कवी आणि साहित्यिक सुभाष पाटील घोडगावकर हेच ते दोन महान विभूती असून संपुर्ण भारत देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव 75 वर्ष साजरा करीत असताना याच महोत्सवात पहिल्या स्वातंत्र्य दिनी जन्मलेल्या मान्यवरांचाही अमृत महोत्सवी वाढदिवस साजरा व्हावा या दृष्टिकोनातून अमळनेर शहर व तालुका पत्रकार संघाच्या पदाधिकाऱ्यांनी 15 ऑगस्ट रोजी प्रा एन आर शाह यांच्या निवासस्थानी जाऊन छोटेखानी सत्कार समारंभ आयोजित केला ,यावेळी तालुक्यातील लोकप्रतिनिधीनाही निमंत्रित करण्यात आले होते, त्यात भाजपाचा प्रदेश उपाध्यक्षा तथा माजी आमदार स्मिताताई वाघ उपस्थित असल्याने त्यांच्यासह अमळनेर शहर व तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष चेतन राजपुत,उपाध्यक्ष जितेंद्र ठाकूर,सचिव चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते प्रा एन आर शाह व जेष्ठ पत्रकार सुभाष पाटील घोडगावकर यांचा सत्कार व शुभेच्छा देण्यात आल्या.यावेळी प्रास्तविक आणि सूत्रसंचालन पत्रकार संजय पाटील यांनी केले यावेळी भाजप शहराध्यक्ष उमेश वाल्हे,तालुका सरचिटणीस जिजाबराव पाटील,राकेश पाटील तसेच पत्रकार महेंद्र रामोशी,किरण पाटील,मुन्ना शेख,युवराज पाटील,कुंदन खैरनार,आबीद शेख,रोहित बठेजा, नूर खान,समाधान मैराळे, सुरेश कांबळे,दिनेश पालवे,काशीनाथ चौधरी यासह पत्रकार बांधव व शाह यांचे कुटुंबीय उपस्थित होते.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम