वरिष्ठ वेतनश्रेणी व निवड वेतनश्रेणीसाठी पात्र शिक्षकांची वेतन निश्चिती त्वरित करण्यात यावी – शेख अब्दुल रहीम

शिक्षण उपसंचालक, लेखाधिकारी (शिक्षण) यांना निवेदन सादर

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । ०६ ऑगस्ट २०२२ । वरिष्ठ वेतनश्रेणी व निवड वेतनश्रेणीचे ऑनलाइन प्रशिक्षण शिक्षकांनी यशस्वीरीत्या पूर्ण केलेले आहे. पात्र शिक्षकांना महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषद, पुणे यांनी प्रशिक्षण प्रमाणपत्र वितरित केलेले आहे. अनेक वर्षे प्रशिक्षण आयोजित न झाल्याने हजारो शिक्षक वरिष्ठ व निवड वेतनश्रेणीच्या लाभापासून वंचित आहे. पात्र शिक्षकांचे प्रस्ताव मंजूर करून वेतनश्रेणी तातडीने मंजूर करणे आवश्यक आहे. कृपया आपल्या विभागातील अधिनस्त सर्व प्राथमिक शाळा, माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालय व अध्यापक विद्यालयातील पात्र शिक्षकांचे वेतन निश्चितीचे प्रस्ताव सादर करण्याबाबत आदेश देण्यात यावे अशा मागणीचे निवेदन औरंगाबाद विभागाचे शिक्षण उपसंचालक मा.अनिलजी साबळे साहेब यांना तसेच लेखाधिकारी (शिक्षण) श्रीमती शैला धोत्रे मॅडम यांना सादर करण्यात आले.

महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेचे राज्य प्रवक्ता तथा हॅप्पी टू हेल्प फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष शेख अब्दुल रहीम सर यांनी आज शिक्षण उपसंचालक कार्यालयात  शिक्षण उपसंचालक साहेब पुणे येथे मीटिंग असल्याने ते कार्यालयात उपलब्ध नसल्याने कार्यालयाचे कनिष्ठ प्रशासन अधिकारी मा.श्री.आव्हाड सर यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. तसेच चर्चाही केली.

लेखाधिकारी (शिक्षण) कार्यालय औरंगाबाद येथे जाऊन लेखाधिकारी शिक्षण श्रीम. शैला धोत्रे मॅडम यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर करून चर्चा केली. औरंगाबाद शिक्षणाधिकारी प्राथमिक व माध्यमिक यांना ही २७ जुलै रोजी निवेदन सादर करण्यात आले आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम