समता पक्षाची याचिका फेटाळली : मशाल ठाकरेंचीच
दै. बातमीदार । १९ ऑक्टोबर २०२२ । राज्यातील शिवसेना पक्षचिन्ह धनुष्यबाण गोठवल्यानंतर ठाकरे गटाला मशाल हे चिन्ह देण्यात आले होते. या चिन्हावर समता पक्षाने आक्षेप घेत उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. मात्र, दिल्ली हायकोर्टाने ठाकरे गटाला दिलासा दिला आहे.
निवडणूक आयोगाने शिवसेनेला दिलेल्या ‘धगधगती मशाला’ या चिन्हावर समता पक्षाने काही दिवसांपूर्वी दावा केला होता. त्यानंतर आता अंधेरी पोटनिवडणुकीत शिवसेनेला मशाल चिन्ह देऊ नये, अशी मागणी समता पक्षाने केली होती. त्याबाबत समता पक्षाकडून दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. या चिन्हावर आपला अधिकार आहे हे दाखवण्यात समता पक्ष यशस्वी होऊ न शकल्याने त्यांची याचिका फेटाळण्यात आल्याचे न्यायमूर्ती संजीव नरुला यांनी आपल्या आदेशात म्हटले आहे.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम