राज ठाकरे यांना पुन्हा रामाचे निमंत्रण ; करणार अयोध्या दर्शन

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १० ऑक्टोबर २०२२ । मनसे अध्यक्ष राज ठाकरे यावर्षी ५ जूनला अयोध्येला जाणार होते. मात्र भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या तीव्र विरोधामुळे त्यांनी अयोध्येला जाणे काही काळ पुढे ढकलले होते. परंतु अभिनेते आणि खासदार मनोज तिवारी म्हणाले की, जर कोणाला रामाचे दर्शन घ्यायचे असेल तर त्याला रोखणे योग्य नाही. विश्व हिन्दू सेवा संघचे प्रमुख मार्गदर्शक अयोध्या हनुमान गढ़ीचे प्रमुख महंत राजूदासजी महाराज व उदासीन अखाड़ाचे महंत श्री धर्मदास महाराज हे शिवतीर्थ निवासस्थानी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची सदिच्छा भेट घेऊन त्यांना अयोध्याला येण्याचे निमंत्रण दिले आहे.

भूतकाळात जर कोणाच्या हातून चूक झाली असेल, तर त्याने सध्याची परिस्थिती लक्षात घेऊन ती खुल्या मनाने सुधारली पाहिजे. तेव्हा उत्तर मुंबईचे खासदार गोपाल शेट्टी म्हणाले होते की, भगवान श्रीरामाचे दर्शन घेण्यासाठी कोणीही अयोध्येला जाऊ शकतो. तिथे जाण्यापासून कोणीही कोणाला रोखू शकत नाही. कोणत्याही प्रकारचे राजकीय मतभेद असतील तर ते वेगळ्या मार्गाने सोडवले जाऊ शकतात. तसेच भाजप खासदार लल्लू सिंह आणि माजी खासदार विनय कटियार यांनीही राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला विरोध करणे चुकीचे असल्याचे म्हटले होते.
अयोध्या दौऱ्यापूर्वी 2008-09 मध्ये उत्तर भारतीयांवर झालेल्या हल्ल्याच्या घटनेबद्दल राज ठाकरे यांनी माफी मागावी, अशी मागणी करत भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांनी राज ठाकरेंना जोरदार विरोध करण्यास सुरुवात केली. मग त्यांनी मनसे अध्यक्षांना उत्तर प्रदेशातील लोकांची किंवा साधू समाजाची किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदींची माफी मागावी, असा सल्ला देत त्यांना ‘उंदीर’ही म्हटले होते. एवढेच नाही तर उत्तर भारतीयांची माफी न मागता राज ठाकरे अयोध्येत आले तर त्यांना ‘आईच्या दुधाची’ आठवण करून दिली जाईल, अशी धमकीही भाजप खासदाराने दिली होती.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम