शैक्षणिक, व्यावहारिक ज्ञानाची सांगड घालावी- अभिजीत पाटील

सॅटर्डे क्लब, बांभोरी कॉलेजतर्फे व्याख्यान

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । ३० सप्टेंबर २०२२ । जळगाव येथील विद्यार्थ्यांनी करियरमध्ये यशस्वी होण्यासाठी शैक्षणिक व व्यावहारिक ज्ञानाची सांगड घालणे आवश्यक आहे असे अभियंता अभिजित पाटील यांनी प्रतिपादन केले.

सॅटर्डे क्लब जळगाव चॅप्टर व एस.एस.बी.टी.बांभोरी कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित व्याख्यानात ते बाेलत होते. रेल्वेच्या विविध विभागात मोठ्या प्रकल्पासाठी निर्मिती कार्यातील त्यांचा असलेला प्रत्यक्ष फिल्डवरील अनुभव त्यांनी विद्यार्थ्यांसमवेत शेअर केला.

यावेळी विभाग प्रमुख प्रा.डॉ. मुजाहिद हुसेन, प्रा.डॉ.प्रविण शिरुळे, प्रा.फारुक चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती. सूत्र संचालन व आभार प्रदर्शन प्रा.गौरी काळे यांनी केले.

कार्यक्रमास प्रा.कविता जाधव, प्रा.जयंत काळे, प्रा.ज्योती माळी, प्रा.सोनाली पाटील यांच्यासह सिव्हील इंजिनीयरींगचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम