
शाळकरी मुले नशेच्या आहारी, पालकहो घ्या खबरदारी!
दै. बातमीदार । २४ सप्टेंबर २०२२ । सध्या मुंबईतील शाळांबाहेर अंमली पदार्थांची विक्री वेगाने वाढली आहे. अशाच घटनेत पोलिसांनी एका महिलेला ताब्यात घेतले असून, तिच्याकडील अंमली पदार्थ जप्त केले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, बिलकीस खान असे या महिलेचे नाव आहे. ही ड्रग्ज विक्रेती महिला अनेक शाळांबाहेर ड्रग्ज विक्री करून शाळकरी मुलांना नशेच्या आहारी नेत होती. नेहमीप्रमाणे बुधवारी ही महिला मुलांना गांजा विकण्यासाठी आली असता, ४-५ किशोरवयीन मुले ही शाळेनजीकच्या बागेत गांजा पित असल्याचे एका व्यक्तीच्या निदर्शनास आले. या व्यक्तीने स्थानिकांच्या मदतीने पकडले आणि महिलेची ओळख पटली.
दरम्यान, पोलिसांनी महिलेच्या घरातून अंमली पदार्थ जप्त केले असून, महिलेला अटक करण्यात आली आहे. सदरील महिला १३ ते १६ वर्षे वयोगटातील मुलांना लक्ष्य करून त्यांना अनेक वर्षांपासून विकत असल्याचे सत्य चौकशीत समोर आले. त्याचबरोबर ही महिला ड्रग्ज कुठून आणायची आणि तिचे इतर साथीदार मुंबईत सक्रिय आहेत की नाही? याचाही तपास पोलीस करत आहेत.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम