खान्देश, विदर्भ ते कोकण जोडणारी गाडी ऑक्टोबरपर्यंत धावणार

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २४ सप्टेंबर २०२२ । नागपूर ते मडगाव दरम्यान धावणाऱ्या विशेष रेल्वे गाडीला ऑक्टोबर अखेरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली विदर्भ ते कोकण जोडणारी ही गाडी आता ३० ऑक्टोबरपर्यंत धावणार आहे.

विदर्भातून थेट कोकण रेल्वेमार्गावर येण्यासाठी रेल्वे गाडी नसल्यामुळे अशा गाडीची वारंवार मागणी होत होती. गर्दीचा हंगाम लक्षात घेऊन या मार्गावर विशेष गाड्यांचे नियोजन रेल्वेकडून करण्यात येते. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नागपूर ते मडगाव (०११३९/०११४०) ही आठवड्यातून दोनदा धावणारी गाडी सप्टेंबर अखेरपर्यंत जाहीर करण्यात आली होती. मात्र, या गाडीची मागणी लक्षात घेऊन, रेल्वेने आता ही गाडी ३० ऑक्टोबरपर्यंत विस्तारित करण्याचा निर्णय घेतला आहे. सुधारित वेळापत्रकानुसार ही गाडी नागपूर ते मडगावपर्यंत चालवली जाणार आहे. त्यानुसार ही गाडी नागपूर येथून बुधवारी तसेच शनिवारी दुपारी तीन वाजून पाच मिनिटांनी सुटून गुरुवार तसेच रविवारी ती मडगावला दुसऱ्या दिवशी सायंकाळी पाच वाजता पोहोचेल.

मडगाव ते नागपूर दरम्यान धावताना ही गाडी (०११४०) गुरुवार तसेच रविवारी मडगाव येथून रात्री आठ वाजता सुटून दुसऱ्या दिवशी रात्री साडेनऊ वाजता ते नागपूरला पोहोचेल.मडगाव ते नागपूर दरम्यान धावताना ही गाडी (०११४०) गुरुवार तसेच रविवारी मडगाव येथून रात्री आठ वाजता सुटून दुसऱ्या दिवशी रात्री साडेनऊ वाजता ते नागपूरला पोहोचेल.

नागपूर ते मडगाव या प्रवासात गाडी वर्धा, पुलगाव, धामणगाव बडनेरा, अकोला मलकापूर, भुसावळ, नाशिक, इगतपुरी, कल्याण, पनवेल, रोहा, खेड, चिपळूण, रत्नागिरी, राजापूर, कणकवली, कुडाळ, थीवीम तसेच करमाळी या स्थानकांवर थांबणार आहे. एक महिन्याच्या कालावधीत या विशेष गाडीच्या दोन्ही बाजूच्या मिळून अठरा फेऱ्या होणार आहेत.

नागपूर मडगाव सुपरफास्ट एक्स्प्रेसचा अधिकाधिक प्रवाशांनी लाभ घ्यावा, असे आवाहन कल्याण सावंतवाडी रेल्वे प्रवासी समन्वय समिती मुंबईचे अध्यक्ष सुनिल उत्तेकर, पुणे कल्याण मार्गे सावंतवाडी रेल्वे प्रवासी समन्वय समिती मुंबई अध्यक्ष यशवंत परब, राष्ट्रीय रेल्वे प्रवासी संघटना शेगांवचे अध्यक्ष राजकुमार व्यास, राष्ट्रीय रेल्वे महिला प्रवासी संघटना शेगांव अध्यक्ष शबनम शेख, सरचिटणीस वैभव बहुतूले, संघटनमंत्री ओमकार माळगांवकर, संपर्कप्रमुख हर्षद भगत, दापोली तालुकाध्यक्ष नागेश मयेकर, मंडणगड तालुकाध्यक्ष संदेश गांधी, प्रवासी सुधीर राठोड, दिपक सोनवणे आदींनी केले आहेत.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम