नवरात्रीतील फलक पाहून मनसे पुन्हा आक्रमक !

बातमी शेअर करा...

बातमीदार | १७ ऑक्टोबर २०२३

राज्यात गेल्या दोन दिवसापासून नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे तर काही दिवसांपूर्वी मुंबईच्या मुलुंडमधील तृप्ती देवरुखकर यांचे प्रकरण चांगलेच चिघळले होते. मुलुंडच्या एका सोसायटीत गाळा भाड्याने घेण्यासाठी गेले असता त्यांना तेथील व्यक्तींनी मराठी माणसांना गाळा दिला जाणार नाही असं म्हटल्याचा आरोप केला होता.आता अशीच काहीशी घटना घडली आहे.

राज्यात मराठी आणि गुजराती वाद अद्यापही शांत झालेला नाहीये. नवी मुंबईच्या कामोठे येथे नवरात्रीत निमित्त आयोजित कार्यक्रमात पटेल समाजाशिवाय इतरांना प्रवेश नाकारण्यात आलाय. पटेल समाजाव्यतिरिक्त इतर व्यक्तींना प्रवेश नसल्याचे फलक पाहून मनसेने पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा हाती घेतलाय. मनसे पदाधिकाऱ्यांनी या प्रकरणी आवाज उठवत आयोजकांची भेट घेतली. आयोजकांची भेट घेऊन त्यांच्याकडून झालेली चूक त्यांच्या लक्षात आणून दिली. यावरून आयोजकांनी देखील तातडीने आपला फलक हटवून सर्वांना परवानगी असल्याचा फलक लावला जाणार असल्याचं म्हटलं. तसेच सर्वांची मफीही मागितली. राज्यात सर्वत्र नवरात्री उत्सव मोठ्या उत्साहात सुरू असताना मराठी आणि गुजराती वाद काही ठिकाणी होताना दिसतो आहे. मात्र इथेही मनसेने स्वत: उपस्थित राहून वाद मिटवलाय. तसेच आयोजकांना समज दिला आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम