
पोदार इंटरनॅशनल स्कुल जळगाव येथे ‘शहीद भगत सिंह जयंती’ उत्साहात साजरी!
दै. बातमीदार । २८ सप्टेंबर २०२२ । थोर भारतीय क्रांतिकारक भगत सिंह यांची जयंती जळगाव येथील पोदार इंटरनॅशनल स्कुल येथे उत्साहात साजरी करण्यात आली.शहीद ए आजम हि पदवी त्यांच्या चाहत्यांनी त्यांना बहाल केली होती. या प्रसंगी कु. मित डेमला व कु. शौर्य काबरा या विद्यार्थ्यांनी शाळेच्या नियोजित कार्यक्रमाची रूपरेषा मांडली.
कार्यक्रमची सुरुवात सकाळी ठीक ८ :०० वाजता दीपप्रज्वलनाने करण्यात आली. शाळेचे प्राचार्य श्री गोकुळ महाजन यांच्या हस्ते शहीद भगतसिंह यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. याप्रसंगी त्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना शहीद भगत सिंह यांच्या जयंती निमित्त शुभेच्छा दिल्या.
कु. गायत्री बारी व कु.खुशरत्न पाटील यांनी राष्ट्रभक्तीस आदरांजली म्हणून देशभक्तीपर कविता सादर केल्या. ई.७ वीच्या विद्यार्थ्यांनी ‘ए मेरे वतन के लोगो’…हे गीत प्रस्तुत केले. दरम्यान कु. सौंदर्या मुथू या विद्यार्थिनीने आपल्या भाषणातून शहीद भगतसिंह यांचे जीवनकार्य विषद केले त्यांच्या महान कार्याला व समर्पणाच्या भावनेला उजाळा दिला. क्रांतिकारक घराण्यात जन्मलेल्या भगत सिंह यांना अन्यायाविरुद्ध संघर्ष करण्याचे बाळकडू त्यांच्या पूर्वजांकडूनच मिळाले होते. स्वातंत्र्य लढ्यात प्राणाची पर्वा न करता शहीद भगतसिंग यांच्या ओठावर शेवटच्या स्वासापर्यंत ‘भारत माता कि जय’हेच शब्द होते.थोर क्रांतिकारी,निर्भीड वक्ते,लेखक व नाट्य अभिनेते असे अष्टपैलू व्यक्तिमत्व होते असे मनोगत तिने यावेळी व्यक्त केले.
विद्यार्थ्यांच्या एका गटाने ‘ओ देश मेरे ..तेरी शान पे सदके..’ या देशभक्तीपर गाण्यावर बहारदार नृत्य सादर केले. कार्यक्रमातून विद्यार्थ्यांनी महान देशभक्तांसाठी दर्शविलेल्या आदर व सन्मानाची उपस्थितांनी प्रशंसा केली. या प्रसंगी शाळेचे उपमुख्याध्यापक श्री दिपक भावसार, पोदार जंबो किड्स च्या मुख्याध्यापिका सौ.उमा वाघ, शिक्षकवृंद तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांनी कार्यक्रमात प्रत्यक्ष उपस्थिती दर्शिविली होती.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम