वैवाहिक जीवन सुखी करण्यासाठी तुळशी विवाहाच्या दिवशी ‘हे’ उपाय करा

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २६ ऑक्टोबर २०२२ । दिवाळी नंतर येणाऱ्या तुळशी विवाह हे सर्वांनाच माहित आहे कि हा सन का साजरा करतात. यंदा तुळशीविवाह 5 नोव्हेंबर, शनिवारी आहे. याच्या एक दिवस आधी एकादशीला भगवान विष्णू 4 महिन्यांच्या योगनिद्रेनंतर जागे होतात. म्हणजेच देवउठी एकादशी 4 नोव्हेंबरला असेल. तुळशी विवाहाच्या दिवशी काही विशेष उपाय केल्यास वैवाहिक जीवनातील सर्व समस्या दूर होऊ शकतात. यासोबतच या उपायांनी पती-पत्नीमधील प्रेमही वाढते. यासोबतच भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने घरात अपार सुख-समृद्धी राहते.

BJP add

या वर्षी तुलसी विवाहाला नसेल लग्नाचा मुहूर्त
अनेक वर्षांनंतर असा योग आला आहे की, तुळशीविवाहाच्या दिवशी या वेळी लग्नासाठी मुहूर्त नसेल. शुक्र नक्षत्राच्या अनुपस्थितीमुळे, तुळशी विवाहाच्या दिवशी विवाहासाठी मुहूर्त नाही कारण लग्नासाठी शुक्र नक्षत्राचा उदय होणे आवश्यक आहे. ज्योतिष शास्त्रामध्ये शुक्र ग्रहाला वैवाहिक जीवनात सुखाचा कारक मानले जाते.

सुखी वैवाहिक जीवनासाठी टिप्स
ज्यांच्या वैवाहिक जीवनात काही समस्या आहेत त्यांनी तुळशी विवाहाच्या दिवशी काही उपाय करावेत. हे उपाय वैवाहिक जीवन प्रेम आणि आनंदाने भरतील. यासाठी तुळशीविवाहाच्या दिवशी पती-पत्नीने पवित्र नदीत स्नान करावे. जर हे शक्य नसेल तर पवित्र नदीच्या पाण्याने घरी स्नान करा. यानंतर स्वच्छ पाण्यात तुळशीची पाने टाका आणि काही वेळाने हे पाणी संपूर्ण घरात शिंपडा.
यामुळे घरातील नकारात्मकता दूर होते आणि पती-पत्नीमधील प्रेम वाढते. याशिवाय पती-पत्नीने तुळशीविवाहात एकत्र सहभागी व्हावे. तुळशीमातेला लाल चुनरी आणि सोळा श्रृंगार अर्पण करा. शक्य असल्यास घरात तुळशीविवाह करा. असे केल्याने वैवाहिक जीवनातील सर्व समस्या दूर होतात.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम