शरद पवारांचा अजित पवारांना पाठींबा नाहीच !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २ जुलै २०२३ ।  राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली आहे यात अजित पवार आपल्यासोबत जवळपास ३० ते ४० आमदारांना घेऊन भाजप शिंदे सरकारमध्ये सामील होणार आहेत. अजित पवार हे सध्या त्यांच्याकडे असलेल्या विरोधीपक्षनेतेपदाचा राजीनामा देवून उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. पण या शपथविधी सोहळ्याला राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा पाठिंबा नसल्याचं सांगण्यात येत आहे.

दरम्यान, राष्ट्रवादीमध्ये पहिल्यांदाच बंड होत असून अजित पवार यांना पक्षाच्या कार्यकारिणीमध्ये कोणतेच पद न दिल्याने ते नाराज होते असं सांगण्यात येत आहे. तर शरद पवार यांचा या शपथविधी सोहळ्याला पाठिंबा नसल्यामुळे आता राजकारणाची पुढची दिशा कशी असेल हे पहावं लागणार आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम