अजित पवार यांच्यासह ४० आमदार राजभवनावर दाखल !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २ जुलै २०२३ ।  राज्यातील शिंदे व फडणवीस यांच्या सरकारमध्ये राष्ट्रवादीचे अजित पवार आपल्या काही समर्थक आमदारांसह राजभवनावर दाखल झाले आहेत. दरम्यान, अजित पवार शिंदे सरकारमध्ये सामील होणार असून उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात आज पुन्हा भूकंप होण्याची शक्यता आहे.

अजित पवार आपला एक गट घेऊन महायुतीला मिळाले आहेत. शिवसेनेनंतर महाराष्ट्रात राष्ट्रवादीत मोठी फूट पडली आहे. अजित पवार यांनी पक्षात दुसऱ्यांदा बंड केलं आहे. अजित पवार यांच्या निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील अनेक बड्या आमदारांची बैठक सुरु होती. तब्बल चार तास ही बैठक सुरू होती. त्यानंतर अजित पवार यांचे पीए राजभवनात दाखल झाले आहे. अजित पवार उपमुख्यंमत्री पदाची शपथ घेवू शकतात. अजित पवार सरकारमध्ये सामील होण्याची जोरदार चर्चा सुरु आहे. राष्ट्रवादीचे 9 आमदार मंत्री पदाची शपथ घेवू शकतात, अशी माहिती सूत्रांनी दिली. राष्ट्रवादीचे 30 आमदार अजित पवार यांच्यासोबत आहेत. या 30 आमदारांच्या सह्यांचे पत्र अजित पवार राज्यपालांना देणार आहेत.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम