शरद पवारांचे नेते करणार मुख्यमंत्र्यांचे स्वागत !

advt office
बातमी शेअर करा...

बातमीदार | १६ सप्टेंबर २०२३ | राज्यातील गेल्या अनेक वर्षानंतर पहिल्यांदा मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या पार्श्वभूमीवर आज संभाजीनगरमध्ये अख्ख राज्य मंत्रिमंडळ दाखल झालं आहे. आजपासून पुढचे दोन दिवस राज्य मंत्रिमंडळाच्या कॅबिनेटची बैठक छत्रपती संभाजीनगरमध्ये होणार आहे. या बैठकीसाठी येणाऱ्या अधिकारी आणि मंत्र्यांसाठी रेड कारपेट टाकण्यात आलंय.

तब्बल 7 वर्षानंतर मराठवाड्यामध्ये मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. यंदा मराठवाडा मुक्ती संग्रामाचं 75 वं वर्ष आहे. त्या पार्श्वभूमीवर ही बैठक होत आहे. यात मराठवाडा आणि संपूर्ण राज्यासाठी मोठे निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे. याच बैठकीवर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाष्य केलं आहे.

 

ट्विट करत जयंत पाटील यांनी राज्य सरकारच्या या बैठकीवर भाष्य केलंय. राज्यात सध्या पाऊस होत नाहीये. अशात सरकारने दुष्काळ केलेला नाही. अति उत्साहात सरकार सुमारे 40 हजार कोटी रुपयांचा निधी देणार असल्याचं म्हटलंय. तशी बातमी पाहिली. तसं असेल तर त्याचं मी मी स्वागत करतो. आधी दिलेली आश्वासनंही पूर्ण केली जातील, अशी आशा व्यक्त करतो, असं जयंत पाटील आपल्या ट्विटमध्ये म्हणालेत.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम