दै. बातमीदार । २६ सप्टेंबर २०२२ । एका पतीने भरदिवसा गळा चिरून पत्नीची हत्या केल्याच्या घटनेने मुंबई हादरले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील टिळकनगर परिसरात ही घटना घडली. मोहम्मद इकबाल शेख या २३ वर्षीय मुस्लिम तरुणाने रुपाली नावाच्या हिंदू तरुणीशी प्रेमविवाह केला. रुपाली-इकबाल यांना एक अपत्यही आहे. इकबाल व त्याचे कुटुंबीय रुपालीला बुरखा घालण्यास व मुस्लिम चालीरितींचे पालन करण्यास सांगत होते, पण हे सर्व करणे तिला मान्य नव्हते.
यावरून दोघांत खूप वादविवाद होत होता. परिणामी, रुपाली इकबालपासून वेगळी राहू लागली. सोमवार (दि.२६) रोजी इकबालने रुपालीला फोन करून भेटण्यास बोलावले. दोघांचा याच मुद्द्यावरून पुन्हा वाद झाला. संतापाच्या भरात रुपालीने इकबालला घटस्फोट देण्याची तंबी दिली. इकबालने मुलाची शपथ देऊन तिची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. परंतु रुपाली तिच्या निर्णयावर ठाम होती.
अखेर, इकबाल रुपालीला एका गल्लीत खेचत घेऊन गेला व तिथे त्याने सुऱ्याने सपासप वार करून रूपालीचा जीव घेतला. रुपाली विव्हळत आरडाओरड करत राहिली आणि काही क्षणांतच तिचा जागीच मृत्यू झाला. यानंतर तिथे लोक जमा झाले पण इकबाल पसार झाला.
दरम्यान, पोलिसांनी इकबालला पकडले व त्याने चौकशीत हेही कबूल केले की, त्याचे आधीही लग्न झाले होते. मुलबाळ होत नसल्याने त्याने पहिल्या बायकोला तलाक दिला होता.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम