गेले, तीव्र आंदोलनाचा इशारा

बातमी शेअर करा...

तांत्रिक दोषामुळे शेतकऱयांचे पिकांचे नुकसान उत्पन्न हातचे

अमळनेर(प्रतिनिधी ) रेल्वेगेट वर बांधलेल्या अंडरपास ला ड्रेनेज नसल्याने तालुक्यातील बाम्हणे व कळंबु शिवारातील सुमारे १५० एकर शेती मध्ये पाणी साचून राहिल्याने शेतीचे नुकसान झाल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केली असून रेल्वेचे अधिकारी दखल घ्यायला तयार नसल्याने संतप्त शेतकरी तीव्र आंदोलनाच्या तयारीत आहेत.

पश्चिम रेल्वे च्या गेट क्रमांक १२६ वर रेल्वे तर्फे अंडरपास बोगदा करण्यात आला आहे. या बोगद्याच्या बांधकामाच्या वेळी ठेकेदाराने ड्रेनेज ची व्यवस्था केली नाही तसेच स्थानिक शेतकऱ्यांना कळू न देता मनमानी पद्धतीने अंडर पास बोगदा बांधला. बोगद्यामुळे शेतकऱ्यांची येण्या जाण्याची सोय झाली मात्र त्याच्या बांधकामामुळे शेतांमध्ये पावसाचे पाणी साचून राहत आहे. शेकडो एकर शेतीत पाणी साचल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून पिकांची नासाडी झाली आहे. उत्पन्न हातचे जाऊन मेहनत आणि पैसा वाया गेला आहे.

याबाबत बाम्हणे व कळंबु शिवारातील चंद्रकांत पोपट पाटील, बाम्हणे विविध कार्यकारी सोसायटी चेअरमन गणेश धर्मराज भामरे, सरपंच प्रविण ओंकार पाटील, धर्मराज रावण पाटील, भिकन बारीकराव पाटील, धनराज गंभीर पाटील, राजेंद्र अभिमन पाटील, संतोष लक्ष्मण पाटील, संजय लोटण पाटील, भैयासाहेब पाटील, किशोर हिम्मत पाटील, युवराज गंभीर पाटील, विनोद मधुकर पाटील, सुभाष ताराचंद पाटील, गोपाळ राजपूत, राजेंद्र राजपूत, रमेश पारधी, मोतीलाल दाभाडे, भास्कर पाटील, भाऊसाहेब पाटील, रमेश पंडित पाटील, प्रभाकर पाटील यांनी पश्चिम रेल्वे चे मंडळ अभियंता दिलीपकुमार शुक्ला यांच्याकडे निवेदनाद्वारे तक्रार केली.

मात्र त्यांनी शेतकऱ्यांना दाद दिली नाही. ९० टक्के शेतकऱ्यांनी कापसाची लागवड केली असून शेतकऱ्यांनी तात्काळ पाण्याचा निचरा करण्याची व्यवस्था करण्याची मागणी आमदार अनिल पाटील व खासदार उन्मेष पाटील, रेल्वे समितीचे राजेंद्र फडके यांच्याकडे केली आहे अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.

आमदार अनिल पाटील यांच्या पाठपुरावामुळे तत्काळ नंदुरबार येथील वरिष्ठ अधिकारी सोमवारी नुकसान बाधित शेतीची पाहणी करण्यासाठी येणार आहेत.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम