अमळनेर लायन्स क्लबचा आज पदग्रहण समारंभ

बातमी शेअर करा...

योगेश मुंदडे प्रेसिडेंट , महावीर पहाडे सेक्रेटरी,अनिल रायसोनी ट्रेझरर

अमळनेर (आबिद शेख )

येथील लायन्स क्लबचा पदग्रहण समारंभ रविवार , दिनांक २६ जून रोजी हॉटेल मिड टाऊन ( तंबोली टॉकीज ) येथे सायंकाळी साडे सहा वाजता होणार आहे. उपप्रांतपाल एमजेएफ गिरीश सिसोदिया इन्स्टोलेशन ऑफिसर आहेत. रिजन चेअरमन जयेश ललवाणी व सुभाष तळेकर प्रमुख पाहुणे आहेत.
नूतन कार्यकारिणीत खान्देश शिक्षण मंडळाचे संचालक योगेश मुंदडे प्रेसिडेंट , माजी नगरसेवक महावीर पहाडे सेक्रेटरी तर अनिल रायसोनी ट्रेझरर पदाचा पदभार स्वीकारतील . तसेच लिओ क्लबच्या नूतन अध्यक्षपदाचा पदभार हरिओम अग्रवाल स्वीकारतील.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम