शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या न्यायालयीन कोठडी १९ सप्टेंबरपर्यंत वाढ

बातमी शेअर करा...

 

दै. बातमीदार । ०५ ऑगस्ट २०२२ । शहरातील एका चाळीच्या पुनर्विकासातील कथित अनियमिततेशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात मुंबईतील विशेष न्यायालयाने शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या न्यायालयीन कोठडीत १९ सप्टेंबरपर्यंत वाढ केली आहे. वास्तविक, संजय राऊत यांची न्यायालयीन कोठडी ५ सप्टेंबरला म्हणजेच आज संपत होती, जी कोर्टाने आणखी १४ दिवसांसाठी वाढवली आहे. गोरेगाव उपनगरातील पत्रा चाळच्या पुनर्विकासात कथित आर्थिक अनियमितता केल्याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) राऊत (६०) याला १ ऑगस्ट रोजी अटक केली होती.

ईडीच्या कोठडीत असलेल्या शिवसेना नेत्याला ८ ऑगस्ट रोजी १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. प्रिव्हेन्शन ऑफ मनी लाँडरिंग ॲक्ट (पीएमएलए)शी संबंधित खटल्यांची सुनावणी विशेष न्यायाधीश एम.जी. देशपांडे यांनी सोमवारी राऊतच्या कोठडीत ५ सप्टेंबरपर्यंत वाढ केली. ईडीने न्यायालयाला सांगितले की, या प्रकरणाचा तपास अद्याप सुरू आहे. पत्रा चाळच्या पुनर्विकासातील कथित आर्थिक अनियमितता आणि राऊत यांची पत्नी आणि सहकारी यांच्यातील आर्थिक व्यवहाराशी संबंधित ईडीची चौकशी आहे.

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय संजय राऊत यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. मुंबईतील पत्रा चाळ प्रकरणी तुरुंगात असलेले शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. न्यायालयाने त्यांच्या न्यायालयीन कोठडीत १९ सप्टेंबरपर्यंत वाढ केली आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम