महामार्गावर शिवशाही बसला भीषण आग !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १७ जून २०२३ ।  राज्यात अनेक दिवसांपासून आगीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यातच आता पुणे नाशिक महामार्गावर शिवशाही बसला भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे.

या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली. या आगीची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले आहेत. या घटनेमुळे परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. चाकण औद्योगिक क्षेत्रातील मुख्य चौकात ही घटना घडली आहे. शिवशाही बसच्या टायरला आग लागल्यामुळे बसने पेट घेतला आहे. या घटनेची माहिती मिळताच चाकण नगरपरिषदेच्या अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी तातडीने दाखल झाले आणि त्यांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने प्रवाशांना बाहेर काढले. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम