…म्हणून आम्ही मोदींसोबत गेलो ; खा.शिंदेंचा ठाकरेंवर घणाघाती टीका !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १७ जून २०२३ ।  राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र खा.श्रीकांत शिंदे यांनी आज थेट उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. कल्याण मध्ये आयोजित शिवसेना मेळाव्यात ते बोलत होते.

खा.शिंदे म्हणाले कि, बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न होते की, 370 कलम हटवले जावे, राममंदिर निर्माण व्हावे. ते स्वप्न पूर्ण करणाऱ्या भाजपसोबत अर्थात मोदींसोबत आम्ही गेलो तर काय चूकीचे केले. असा प्रश्न विचारत खासदार श्रीकांत शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली. तुम्हाला मुंबईतील नगरसेवक देखील सांभाळता येत नाही, तुमच्या अडवणुकीमुळे लोक सोडून गेले, असा आरोप श्रीकांत शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर केला.

कल्याण लोकसभा मतदार संघावरून भाजप-शिवसेना युतीत गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू आहे. रविंद्र चव्हाण आणि श्रीकांत शिंदे यांच्यातील वाद चांगलाच पेटला होता. त्यानंतर आज कल्याणमध्ये शिवसेनेचा कार्यकर्ता पदाधिकारी मेळावा झाला. खोके खोके म्हणून आम्हाला काही लोक हिनवतात. मला तर वाटते की, झोपेत देखील तसेच बरळत असतील. आम्हाला खोके खोके म्हणताय ना, हो आम्ही खोके घेतले. पण निधीच्या रुपात ते आम्हाला मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले. ज्यातून आम्ही विकासाचे काम करतोय. मुंबईतील नगरसेवक देखील उद्धव ठाकरेंना सांभाळता येत नाही, अनेक लोक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत येत आहेत. कारण ते चोवीस लोकांसाठी उपलब्ध आहेत. त्यांची कामे होत आहेत. सर्वसामान्यांचे प्रश्न मार्गी लावण्याचे काम हे युतीचे सरकार करत आहे, असे मत खासदार श्रीकांत शिंदे यांनी मांडले. ठाकरे मुख्यमंत्री असताना ‘वर्षा’ बंगल्यावर प्रवेश नव्हता. आता चोवीस कोणीही मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर लोकांना जाता येते. कारण ते सर्वांसाठी काम करतात. स्वतःच्या आरोग्याची देखील काळजी घेत नाहीत.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम