शरद पवारांना धक्का ; ‘ते’ आमदार पुन्हा अजित पवारांच्या गटात !
दै. बातमीदार । ११ जुलै २०२३ । राज्यातील काही आमदारांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांना पाठिंबा दिला होता आता त्या आमदारांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बोलावलेल्या बैठकीला उपस्थित राहिलेल्या आमदारांमधील एका आमदारांनी आज अजित पवार यांची भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे. शपविधीच्यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे गेलेले अकोल्याचे आमदार डॉ. किरण लहामटे नंतर ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासोबत गेले. त्यानंतर पुन्हा गाठीभेटी सुरू झाल्या.
आज पुन्हा अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्याचे आमदार डॉ. किरण लहामटे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भेटण्याकरता देवगिरी या शासकीय निवासस्थानी दाखल झाले आहेत. वाय बी चव्हाण सेंटर येथे शरद पवार पक्षाची बैठक बोलावली होती त्या बैठकीत किरण लहामाटे हे उपस्थित होते. आज ते उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेण्याकरता आले आहेत.
अजित पवार यांच्या शपथविधीच्या वेळी डॉ. लहामटे अजित पवार यांच्यासोबत होते. त्यापूर्वी तयार करण्यात आलेल्या अनेक कागदपत्रांवर त्यांनी सह्या देखील केल्या होत्या. मात्र, दुसऱ्या दिवशी लहामटे शरद पवार यांच्याकडे परतले. मुंबईतील सभेला त्यांनी उपस्थितीही लावली त्यामुळे पुन्हा ते कोणाला पाठिंबा देणार याबाबत याबाबत चर्चा सुरू झाल्या होत्या. आपल्याकडून फसवून सह्या करून घेतल्याचे त्यांनी म्हंटलं होतं. तेव्हापासून लहामटे यांना परत आणण्याचे प्रयत्न सुरू झाले होते.
अजित पवार यांनी लहामटे यांना परत आणण्याची जबाबदारी नगरचे विळद येथील त्यांचे विश्वासू कार्यकर्ते बाळासाहेब जगताप यांना देण्यात आली होती. जगताप यांनी डॉ. लहामटे यांची समजूत काढली. मात्र, ते सहजासहजी तयार होत नव्हते. विविध माध्यमांतून लहामटे यांच्याशी संपर्क साधण्याचा, त्यांचे मन वळविण्याचा प्रयत्न केला, मात्र लहामटे त्यांना टाळत होते. त्यानंतर आज लहामाटे अजित पवार यांच्या भेटीला आले आहेत.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम