हिमाचल निवडणुकीत मुख्यमंत्री पदासाठी शक्ती प्रदर्शन ?

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । ९ डिसेंबर २०२२ ।  देशातील चर्चेत असलेली हिमाचल प्रदेशाच्या निवडणुकीत कॉंग्रेसने बहुमत मिळाले आहे. तर हिमाचल प्रदेशमध्ये मतदारांनी आपली पंरपरा कायम ठेवली आहे. कोणत्याही पक्ष दुसऱ्या वेळी लागोपाठ सत्तेत येत नाही. त्यामुळे भाजपची सत्ता जावून आता राज्यात काँग्रेसची सत्ता आली आहे. काँग्रेसने बहुमत मिळवल्यानंतर आता हिमाचल प्रदेशात मुख्यमंत्रीपदावरून मंथन सुरू झाले आहे. याबाबत शिमल्याच्या हॉटेलमध्ये काँग्रेस नेत्यांची बैठक सुरू आहे. मुख्यमंत्रीपदासाठी आतापासून शक्तीप्रदर्शन सुरु झाले आहे.

प्रतिभा सिंह म्हणाल्या होत्या की, ‘आमदार त्यांचा नेता निवडतील आणि त्यांचे मत पक्ष हायकमांडला कळवतील. मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत आहे असे म्हणत नाही, पण ही निवडणूक वीरभद्र सिंह यांच्या नावाने जिंकली आहे. त्याच्या कुटुंबाचा वारसा आपण दुर्लक्षित करू शकत नाही.’ शिमल्यात काँग्रेस आमदारांची बैठक होत आहे. मुख्यमंत्र्यांचा चेहरा ठरवण्यासाठी काँग्रेसचे निरीक्षक भूपेंद्र हुडा आणि भूपेश बघेल हे शिमल्यात आले आहेत. हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने 68 पैकी 40 जागांवर बहुमत मिळवले आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्री कोण होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. शिमला काँग्रेस कार्यालयात विधिमंडळ पक्षाची बैठक होणार आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम