
सिद्धार्थ-कियारा लग्नात इतका झाला खर्च !
दै. बातमीदार । ९ फेब्रुवारी २०२३ । बाॅलिवूडमधील सर्वात लोकप्रिय कपलपैकी एक म्हणजे सिद्धार्थ-कियारा आहेत. कित्येक दिवसांच्या रिलेशननंतर अखेर मंगळवारी सिद्धार्थ-कियारानं लग्नगाठ बांधली. राजस्थानमधील जैसलमेर येथील सुर्यगढ पॅलेसमध्ये सिद्धार्थ-कियारा विवाहबद्ध झाले. सुर्यगढ पॅलेस हे बाॅलिवूड आणि हाॅलिवूड कलाकारांचे पसंतीचे ठिकाण मानले जाते.
तसेच महागडे ठिकाण म्हणूनही सुर्यगढ पॅलेसची ओळख आहे. या पॅलेसचे एका दिवसाचे भाडे १. ५ कोटी आहे. पीक टुरिस्ट सीझनमध्ये या पॅलेसचे एका दिवसासाठी २ कोटीही घेतले जाऊ शकतात. सिद्धार्थ-कियारानं या पॅलेसची बुकींग तीन दिवसांसाठी केली होती.
तसेच कियारानं लग्नात घातलेल्या दागिन्यांची किंमतही कोटींमध्ये आहे. सिद्धार्थनं लग्नात परिधान केलेली शेरवानीसुद्धा अत्यंत महागडी आहे. त्यामुळं सिद्धार्थ-कियाराचं लग्न हे महागड्या लग्नांपैकी एक ठरत आहे. दरम्यान, सध्या सिद्धार्थ-कियाराच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत आहेत. नेटकरी कमेंट्सच्या माध्यमातून त्यांना शुभेच्छा देत आहेत.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम