काय सांगता ! थंड पाण्याने अंघोळ केल्या होणार वजन कमी !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । ९ फेब्रुवारी २०२३ । आपण नेहमी आपले वजन कमी करण्यासाठी वेगवेगळे उपाय करीत असतो व काही लोकांना त्याची माहिती सुद्धा नेहमी देत असतो पण वजन कमी करण्यासाठी एक नवीन माहिती समोर आली आहे. थंड पाण्याने अंघोळ केल्याने वजन कमी होते, हे तुम्हाला माहित आहे का ? एक संशोधन समोर आले आहे ज्यामध्ये अशाच अनोख्या आरोग्यविषयक कल्पनांबद्दल सांगण्यात आले आहे. एका बातमीनुसार, थंड पाण्याने आंघोळ केल्याने शरीराचे तापमान बदलते आणि त्यामुळे आपले मेटाबॉलिज्म सुधारण्यास सुरुवात होते. मेटाबॉलिज्म दर योग्य ठेवल्याने वजन कमी करणे सोपे होते हे आपणा सर्वांनाच माहीत असते.

बातम्यांनुसार, संशोधकांमध्ये कॅलरी बर्न टिप्सबाबत वाद सुरू होता. काहींचा असा विश्वास आहे की 15 मिनिटे थंड पाण्याच्या शॉवरखाली अंघोळ केल्याने 62 कॅलरीज बर्न होऊ शकतात, तर काहीजणांचे असे म्हणणे आहे की, या पद्धतीमुळे काही फरक पडत नाही.

तसेच, या संशोधनात असेही नमूद करण्यात आले आहे की थंड पाण्याने आंघोळ केल्याने झोपेची गुणवत्तादेखील देखील सुधारली जाऊ शकते. अशाच काही दैनंदिन सवयींबद्दल जाणून घेऊया, ज्याद्वारे तुम्ही कॅलरी जलद बर्न करू शकता आणि गोड खाणं सोडण्याची परिस्थिती उद्भवणार नाही.

प्रत्येक व्यक्तीला ला जिम किंवा वर्कआउटसाठी वेळ काढणे शक्य नसते. तरीही वजन कमी करायचं असेल तर रोज घर स्वच्छ करायला हवं. तंदुरुस्त राहण्यासाठी, खाली वाकून लादी पुसणे, केर काढणे, आणि घर झाडणे यासारख्या शारीरिक हालचाली दररोज करता येऊ शकतात. त्यामुळे तुमचं घर तर स्वच्छ होतंच पण शारीरिक हालचाल होऊन वजन कमी होण्यासही मदत होते.

2012 साली एका अभ्यासातून अशी माहिती समोर आली होती, त्यानुसार 100 ग्रॅम सेलेरीमध्ये फक्त 2 कॅलरीज असतात. एका व्यक्तीने नियमितपणे सेलेरी खाणे सुरू केले आणि असे केल्याने त्याला कॅलरीज बर्न करण्यास मदत झाली. त्यामुळे वजन घटवायचे असेल तर अन्य उपायांसोबतच तुम्ही सेलेरीही खाऊ शकता. मात्र तुम्हाला अशा काही पदार्थांची ॲलर्जी असेल तर आधी डॉक्टरांशी बोलून त्यांचा सल्ला घेणे इष्ट ठरते. शॉपिंगचा आणि वजन कमी करण्याचा काय संबंध, असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल. पण त्याच संबंध आहे. बाजारात गेल्याने किंवा खरेदीने आपल्या खिशाला चाट नक्कीच बसतो, पण वजन कमी करण्यासाठीदेखील ही पद्धत सर्वोत्तम आहे. जर तुम्ही सुपरमार्केटमध्ये गेलात तर सामान घेऊन जाणारी ट्रॉली घेऊन इकडे-तिकडे जरूर फिरा. अशा प्रकारे, आपण सुमारे 30 मिनिटांत सुमारे 250 कॅलरीज बर्न करू शकता.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम