तर बिनधास्त दाखवायला हवं’ ; प्राजक्ता माळी वादाच्या भोवऱ्यात

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । ३ डिसेंबर २०२२ ।  मराठीमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळी ही नेहमीच पोस्टसाठी सोशल मीडियावर चर्चेत असते. पण आताची तिची पोस्ट तीला खूप महागात पडली आहे. प्राजक्ताने काही बोल्ड फोटो शेयर केले आहेत. या फोटोला कॅप्शनही तितकेच भन्नाट दिले आहे. त्यामुळे प्राजक्ता आता भलतील ट्रोल होत आहे.

‘जर तुमचे शरीर सुंदर शेप मध्ये असेल तर बिनधास्त दाखवायला हवं’ असं ती म्हंटली आहे. पण ‘तुझ्याकडून ही अपेक्षा नाही’, ‘तुझी सई ताम्हणकर होत चाललीय’, ‘तुला अशा बोल्डनेसची गरज नाही’, ‘तुझ्याविषयीचा आदर कमी होत चाललंय’ अशा अनेक कमेंट तिच्या फोटोंवर आल्या आहेत. तर काहींनी तिचे कौतुकही केले आहे.

प्राजक्ताने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन काही बोल्ड फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये तिने काळ्या रंगाचा हाय स्टाइलचा बोल्ड ड्रेस परिधान केला आहे. बन हेअरस्टाइल करत प्राजक्ताने खास लूक केला आहे. यावेळी तिने हा ड्रेस पायाच्या वरपर्यंत घेऊन काही पोज दिल्या आहेत. हाच तिचा बोल्ड ड्रेस आणि बोल्ड लुक प्राजक्ताच्या अंगाशी येणार दिसतंय. कारण तिच्यावर चाहते प्रचंड नाराज झाले आहेत. विशेष म्हणजे यावर तिने एक भन्नाट कॅप्शन दिले आहेत.

 

मराठी सिनेसृष्टीत सध्या अभिनेत्री प्राजक्ता माळीची बरीच चर्चा आहे. तिची ‘रानबाजार’ वेब सिरिज असो ‘वाय’ सिनेमा किंवा वैयक्तिक आयुष्यातील काही घडामोडी, ती सतत प्रकाशझोतात असते. काही दिवसांपूर्वी ती लंडन मध्ये एका चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी गेली होती. सध्या ती ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’ या कार्यक्रमाच्या चित्रीकरणात व्यस्त आहे. ‘रानबाजार’ वेब सिरिजवेळी तिच्या बोल्ड लुकमुळे तिच्यावर प्रचंड टीका झाली. आज पुन्हा तिच्या बोल्डनेस वर चाहते नाराज झाले आहेत.

 

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम