जय सियाराम हे वाक्य भाजप व आरएसएसला चालत नाही ; राहुल गांधी

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । ३ डिसेंबर २०२२ । देशात सुरु असलेली भारत जोडो यात्रा सुरु आहे याच दरम्यान यात्रा जेव्हा राज्यात होती तेव्हा सावरकर यांच्याबद्दल बेताल विधान करून मोठा वाद निर्माण झाला होता आता पुन्हा राहुल गांधी यांनी एक विधान केले आहे. शुक्रवारी त्यांनी भाजप व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला जय सियाराम म्हणण्याचा सल्ला दिला होता. तसेच जय श्रीराम व जय सियाराममधील फरकही स्पष्ट करून सांगितला होता.

राहुल गांधींची भारत जोडो यात्रा शुक्रवारी मध्य प्रदेशातील आगर-माळव्यात होती. तिथे आगर येथील सभेला मार्गदर्शन करताना राहुल यांनी ‘जय श्रीराम’, ‘जय सियाराम’ व ‘हे राम’च्या नाऱ्याची व्याख्या सांगितली. ते म्हणाले – ‘जय सियारामचा अर्थ काय आहे? जय सीता व जय राम, म्हणजे सीता व राम एकच आहे. त्यामुळे जय सियाराम किंवा जय सीताराम म्हटले जाते. भगवान राम सीतेच्या अब्रुसाठी लढले. त्यामुळे आम्ही जय सियाराम म्हणून समाजातील महिलांचा सीतेसारखा आदर करतो. जय श्रीराम, यात आपण भगवान रामाचा जयजयकार करतो. पंडितजींनी मला आपल्या भाषणात भाजपचे लोक जय श्रीराम ऐवजी जय सियाराम व हे राम का म्हणत नाहीत हे विचारण्यास सांगितले. RSS व भाजपचे कार्यकर्ते श्रीरामासारखे आयुष्य जगत नाहीत. रामने कुणावरही अन्याय केला नाही. रामाने समाजाला जोडण्याचे काम केले. आपल्या सर्वांचा आदर केला. पण RSS व भाजपचे लोक भगवान रामाची ही जीवनपद्धती स्वीकारत नाहीत. ते सियाराम व सीताराम म्हणूच शकत नाहीत. कारण, त्यांच्या संघटनेत एकही महिला नाही. म्हणजे त्यांची संघटना जयसिया रामची नाही. त्यांच्या संघटनेत सीता येऊच शकत नाही. त्यांनी सीतेला बाहेर ठेवले आहे. हे गोष्ट मला एका पंडिताने रस्त्यात चालताना सांगितली. RSSच्या लोकांनी जय श्रीरामच्या जागी जय सियाराम व हे रामचा वापर केला पाहिजे. त्यांनी सीतेचा अवमान करू नये. गांधीजी हे राम म्हणत होते. त्यांचा नाराच हे राम होता. हे राम म्हणजे काय? हे रामचा अर्थ राम एक जगण्याची पद्धती होती. भगवान राम केवळ एक व्यक्ती नव्हते. जीवन जगण्याचा एक मार्ग होते. प्रेम, बंधूभाव, आदर, तपश्चर्येने त्यांनी संपूर्ण जगाला जगण्याचा मार्ग दाखवला. गांधीची हे राम म्हणत होते. त्यांच्या मते, भगवान राम आपल्या मनात आहेत. त्याच भावनेने आपल्याला आयुष्य जगायचे आहे. हेच राम आहेत.’

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम