मेष – आज दिवस मजेत घालवा. राशीतील गुरू प्रसिद्धी आणि आकर्षक व्यक्तिमत्त्व देतील. घरामध्ये सत्संग घडेल. भावंडांची जबाबदारी पार पाडाल. कुटंब आणि आर्थिक दृष्ट्या मध्यम दिवस.
वृषभ – व्यय राहू गुरू धार्मिक खर्च निर्माण करेल . काही आनंदाचे प्रसंग देखील येतील .खुश रहा. कार्यालयीन कामा निमित्त प्रवास , नातेवाईक भेट संभवते. घरात विशेष घटना घडतील. दिवस सुखद.
मिथुन – लाभ स्थानात चंद्र आहे. काही कारणाने खूप ताणाचे वातावरण आहे. चूक होऊ शकते. कार्य करताना विचार करा. संतती व्यस्त राहील. व्यवसाय आणि आर्थिक दृष्ट्या बरा दिवस.
कर्क – दशम गुरू आणि चंद्र दशम स्थानात नोकरीत आर्थिक विकास करेल. वैवाहिक जीवनात जपुन राहण्याचे संकेत आहे. व्यवसायात लाभ होईल. घरामध्ये प्रकृती जपून काम करा..दिवस बरा .
सिंह – आर्थिक दृष्ट्या दिवस उत्तम आहे. गृह सौख्य मिळेल. भाग्य स्थानातील ग्रह प्रत्येक गोष्टीत साथ देतील. सप्तम शनी आणि राशीतील मंगळ वैवाहिक जीवनात ताण निर्माण करेल. योगायोगाने कोणी मोठी व्यक्ती भेटेल. कौटुंबिक दृष्ट्या दिवस साधारण.
कन्या – समाज आणि शैक्षणिक क्षेत्रात नवीन संधी मिळतील. संतती सुख मिळेल. चंद्र नातेवाईक भेट घडवून आणेल. तसेच आर्थिक लाभ होतील. प्रवास योग येतील. जोडीदाराच्या आरोग्या संबंधी काळजी घ्या. दिवस उत्तम.
तुला – शुक्र घरामध्ये आवश्यक वस्तूंची खरेदी करील. खर्च भरपूर होईल पण नवीन संधी मिळतील . जबाबदारी येईल. संततीच्या आयुष्यात अनेक बदल होतील. लक्ष द्या . प्रवासात जपून रहा. दिवस मध्यम.
वृश्चिक – मंगळ शुक्र सिंह राशीत वृश्चिक व्यक्तींना चांगली संधी आणेल. फायदा घ्या. प्रयत्न पूर्वक शांत रहा. नैराश्याचा झटका येऊ शकतो. वैवाहिक जीवनात गैरसमज टाळा. चंद्र गृह सौख्य,संतती यासाठी मध्यम फळ देईल .
धनू – गुरू राहू घर आणि वाहन या बाबतीत अडचणी आणील.. पंचम गुरू चंद्र योग घडामोडी निर्माण करणार आहे. प्रकृती जपा. नातेवाईक भेट होईल . लिखाण मध्ये यश मिळेल. आर्थिक लाभ होतील . व्यवसाय नोकरी साठी मध्यम दिवस.
मकर – चतुर्थ स्थानात चंद्र नवीन संधी प्राप्त करून देईल. संततीची उत्तम प्रगती होईल. मित्र भेट संभवते. खर्च जपून करा. घरामध्ये पाहुणे येतील. जोडीदाराची काळजी घ्या. दिवस शुभ.
कुंभ – राशीतील शनी आणि तृतीय चंद्र शुभ नसून व्यवसायात जपून असा असे संकेत देत आहे. सप्तम मंगळ शुक्र नाते संबंध ताणलेले असून सामाजिक जीवनात कष्ट देईल.. दिवस बरा.
मीन – राशी स्वामी शुभ आहे. गुरू उपस्थिती मुळे सामाजिक, आर्थिक जीवनात अनेक गोष्टींमुळे प्रसिद्धी असा हा काळ आहे. अध्यात्मिक अनुभव येतील. प्रवास, बंधुभेट संभवते. दिवस मध्यम
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम