‘कभी खुशी कभी गम’ चित्रपटातील अभिनेत्रीने केला साखरपुडा !

बातमी शेअर करा...

बातमीदार | ६ ऑगस्ट २०२३ | गेल्या २२ वर्षाआधी करण जोहरच्या ‘कभी खुशी कभी गम’ सिनेमा आज देखील अनेक चाहत्यांना आठवणीत आहे. त्यामुळे या सिनेमाने खूप पैसा देखील कमविला आहे. यात अमिताभ बच्चन, शाहरुख खान, हृतिक रोशन, काजोल, करिना कपूर आणि जया बच्चन अशी तगडी स्टारकास्ट असलेला सिनेमा सुपरहिट ठरला होता. यामध्ये करिना कपूरच्या बालपणीची भूमिका साकारलेली अभिनेत्री आठवतेय का? छोटी पूजा म्हणजेच मालविका राजने नुकताच साखरपुडा उरकला आहे. तिचे इंटिमेट एंगेजमेंट सेरेमनी फोटो सध्या व्हायरल होत आहेत.

मालविका राजने बॉयफ्रेंड प्रणव बग्गा सोबत टर्कीमध्ये साखरपुडा केला. या फोटोंमध्ये प्रणव गुडघ्यावर बसला असून अभिनेत्रीला प्रपोज करताना दिसतोय. तर त्यांच्या आजूबाजूला हॉट एअर बलून्स आहेत. मालविकाने फोटो शेअर करत सर्वांसमोर नात्याची कबुली दिली आहे. तिने पांढऱ्या रंगाचा ऑफ शोल्डर गाऊन घातला आहे. मालविकाचे हे फोटो एखाद्या स्वप्नासारखेच सुंदर दिसत आहेत. मनोरंजनक्षेत्रातील अनेक कलाकारांनी आणि तिच्या फॉलोअर्सने मालविकाला शुभेच्छा दिल्या आहेत.

29 वर्षीय मालविका लवकरच प्रणव बग्गासोबत विवाहबंधनात अडकणार आहे. ‘कभी खुशी कभी गम’नंतर मालविका फारशी कुठे दिसली नाही. तिने आई वडिलांच्या सांगण्यानुसार शिक्षणाकडे लक्ष द्यायचे ठरवले होते. तर प्रणव बग्गा हा उद्योगपती आहे. तो देखील सोशल मीडियावर प्रचंड अॅक्टिव्ह आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम