कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला ललित कला प्रकारात दोन सुवर्ण तर एक कास्य पदक प्राप्त

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार | ४ एप्रिल २०२४ | लुधियाना येथील पंजाब कृषी विद्यापीठात झालेल्या ३७ व्या आंतर विद्यापीठीय राष्ट्रीय युवक महोत्सवात कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला ललित कला प्रकारात दोन सुवर्ण, एक कास्य पदक प्राप्त झाले. याशिवाय सांस्कृतिक पथसंचलनात चौथ्या क्रमांकाचे पारितोषिक मिळाले.

लुधियाना येथे राष्ट्रीय युवक महोत्सव नुकताच पार पडला. ललित कला प्रकारात क्ले मॉडेलिंग मध्ये देवा सपकाळे या विद्यार्थ्याला सुवर्णपदक प्राप्त झाले. इन्स्टॉलेशन मध्ये देखील सुवर्ण पदक मिळाले. यामध्ये देवा सपकाळे, तौसिफ शेख आणि माधुरी बडगुजर हे विद्यार्थी सहभागी होते. स्पॉट फोटोग्रॉफी मध्ये समय चौधरी या विद्यार्थ्याला कास्य पदक प्राप्त झाले. विद्यापीठाच्या संघाला सांस्कृतिक पथसंचलनात चौथ्या क्रमांकाचे पारितोषिक मिळाले. हे सर्व विद्यार्थी जळगावच्या मुळजी जेठा महाविद्यालयातील कान्ह ललित कला केंद्राचे विद्यार्थी आहेत. या संघासोबत संघव्यवस्थापक म्हणून डॉ. योगिता चौधरी (गरूड महाविद्यालय, शेंदुर्णी) व प्रा. पियुष बडगुजर (मुळजी जेठा महाविद्यालय, जळगाव) हे सहभागी होते.

कुलगुरू प्रा.व्ही.एल. माहेश्वरी, प्र-कुलगुरू प्रा. एस.टी. इंगळे, कुलसचिव डॉ. विनोद पाटील, के.सी.ई. संस्थेचे अध्यक्ष तथा व्यवस्थापन परिषद सदस्य नंदकुमार बेंडाळे, वित्त व लेखाधिकारी सीए रवींद्र पाटील, विद्यार्थी विकास संचालक डॉ. जयेंद्र लेकुरवाळे तसेच शशिकांत वडोदकर, प्राचार्य स.ना. भारंबे यांनी अभिनंदन केले.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम