प्रताप महाविद्यालयात प्रवेशसासाठी मॅनेजमेंट कोट्यातील घोडेबाजारर थांबवा; गुणवत्ताधारक गरीब, होतकरू, गरजू विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाचा फायदा व्हावा

खाशिचे संचालक कल्याण पाटील यांनी मॅनेजमेंट कोट्यातील मॅनेजवर पत्रकाद्वारे टाकला प्रकाश

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १७ जुलै २०२२ । खान्देश एज्युकेशन सोसायटीने जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात आपल्या गुणवत्तेचा आलेख उंचावला आहे. परंतु गेल्या काही वर्षापासून मॅनेजमेंट कोट्यातून अव्वाच्या सव्वा रुपये डोनेशन घेऊन प्रवेश दिला जात आहे. यात खरे गुणवंत विद्यार्थी डावले जात असून संस्थेचीही बदनामी होत आहे. त्यामुळे मॅनेजमेंट कोट्याचा घोडेबाजार थांबवून त्या जागाही गुणवत्तेनुसारच भरून संस्थेची होणारी बदनामी थांबवावी, अशी मागणी राज्यपाल आणि कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या कुलगुरूंकडे केली आहे. याची राज्यपालांनीही दखल घेतली आहे, अशी माहिती खाशिचे संचालक कल्याण साहेबराव पाटील यांनी रविवारी पत्रकाद्वारे प्रसिद्धीस दिली आहे.

BJP add

खाशिचे संचालक कल्याण साहेबराव पाटील यांनी पुढे बोलताना सांगितले की, स्व. प्रताप शेठ यांनी स्थानिक गोर गरीबांच्या मुलांना चांगले आणि उच्च दर्जाचे शिक्षण मिळाले म्हणून खान्देश एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. त्यामुळे या संस्थेचा लौकीक हा संपूर्ण राज्यभर पसरला आहे. पैशांपेक्षा गुणवत्तापूर्ण शिक्षण हे संस्थेचे धोरण आहे. मात्र खान्देश एज्युकेशन सोसायटी संचलित प्रताप महाविद्यालय व उच्च महाविद्यालयामध्ये तिन्ही शाखांच्या ११ वी वर्गापासून ते एम.एससी, एम.ए., एम कॉम आणि डीफार्मसीमध्ये काही जागा या मॅनेजमेंट कोट्यातून भरल्या जातात. यासाठी सत्ताधारी संचालकांकडून विद्यार्थ्यांची आर्थिक परिस्थिती पाहून अव्वाच्या सव्वा रुपये घेऊन प्रवेश दिला जातो. या मॅनेजमेंट कोटयातील प्रवेश घेऊन इच्छेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या जागा या गुणवत्ता नसलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. या मॅनेजमेंट कोट्यातील जागांच्या संदर्भात मोठ्या प्रमाणात लाखो रुपयांची आर्थिक उलाढाल होते. यामुळे गुणवत्ता यादीतील विद्यार्थ्यांपेक्षा २-३ टक्के कमी गुण असलेल्या गरजू, गरीब व आर्थिक दृष्ट्या सक्षम नसलेल्या विद्यार्थ्यांना पैशांअभावी या वर्गामध्ये प्रवेश मिळवता येत नाही. त्यामुळे अशा गरीब, होतकरू आणि गरजू विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणापासून वंचित राहावे लागते. हा त्यांच्यावर एक प्रकारे अन्यायच असून गुणवत्ताही डावलली जात आहे. या शिक्षणाचा सुरू असलेल्या बाजाराबाबत कोणीही बोलायला तयार नाहीत.

तक्रारीची थेट राज्यपालांनी घेतली दखल

पुढे पत्रकार परिषदेत कल्याण पाटील यांनी सांगितले की, मॅनेजमेंट कोट्यातील इयत्ता ११ वी पासून ते एम.एससी, बी.सी.ए.,एम.ए., एम.कॉम पर्यंत असलेला मॅनेजमेंट कोट्यातील जागा रद्द करून त्या गरीब व गरजू आणि गुणवंताधारक विद्यार्थ्यांना देण्यात यावा, अशी मागणी आपण कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या कुलगुरूंकडे केली होती. तसेच निवेदनाच्या प्रति या राज्यपाल, तंत्रशिक्षण संचालनालयाचे संचालक डॉ. अभय वाघ यांना पाठवल्या होत्या. याची फार्मसी कॉन्सिल ऑफ इंडिया, व राज्यपालांनी, दखल घेऊन त्यांचे अवर सचिव रा. शि. कदम यांनी खान्देश शिक्षण मंडळातील संचालकांचा मॅनेजमेंट प्रवेश कोटाच्या जागा रद्द करण्याबाबत कुलगुरूंनी आपल्या स्तरावर योग्य कार्यवाही करावी, असे पत्र कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला दिले आहे.

यापुढे गुणवत्ता डावलल्यास आपण न्याय मिळवून देऊ

अमळनेर शहर आणि तालुका हा गोरगरीब आणि कष्टकऱ्यांचा तालुका आहे. यातील गोरगरीबांच्या मुलांना चांगले शिक्षण मिळावे म्हणून मॅनेजमेंट कोट्यातील जागाही गुणवत्तेनुसारच भराव्यात, अशी आपली मागणी आहे, विद्यामान संचालकांनी या कोट्यासाठी पैशांची मागणी केल्यास किंवा या अगोदर प्रवेशाकरिता देणगी घेतली असेल ती परत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करेल तरी पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी थेट व्हाट्सप 9422423456, 8805604777, ईमेल- kalyanpatil99@rediffmail.com, वर आपल्याशी संपर्क साधावा, त्यांना आपण त्यांच्या गुणवत्तेनुसार न्याय मिळवून देण्यास बांधिल आहोत. त्यामुळे गुणवत्ता असूनही प्रवेशासाठी डावलले गेल्यास बिनधास्तपणे संपर्क साधवा, असे आवाहन ही कल्याण पाटील यांनी एका पत्रकाद्वारे माहीती दिली आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम